Sharad Pawar : विधानसभेवरून शरद पवारांनी केलं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, आगामी निवडणूक…

Sharad Pawar : राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सर्व राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. राज्यात येणार हे येत्या दिवसात स्पष्ट होईल. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभेवरून मोठं वक्तव्य केले आहे.

नुकतंच खासदार संजय राऊत यांनी जेडीयू, टीडीपीचे खासदार नाराज आहेत असं विधान केलं आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “माझ्या ऐकण्यात आलेलं नाही. सध्या कोणत्याही खासदाराला निवडणूक नको आहे. अशी काही गडबड झाली, तर निवडणुकीला सामोर जावं लागू शकते. नको रे बाबा निवडणूक अशी भावना आहे,” असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसभा निवडणुकीनतंर काय दृष्टीकोन बदललाय असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला असता ते म्हणाले की आता आपले फक्त लक्ष्य एकच आहे. उद्याची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक. या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवेसना एकत्र लढणार आहे,”असं शरद पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीची धाकधूक वाढली आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट, डावे सुद्धा सोबत होते. त्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. त्यामुळे त्यांच्या हिताची जपणूक करणं आमची नैतिक जबाबदारी आहे. आमच्या केवळ तीन महिने हातात आहेत. दोन अडीच महिने मिळतील, त्याचा लाभ कसा घेता येईल, हा आमचा प्रयत्न आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी शनिवारी महाराष्ट्रात कोणत्याही एका नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देण्याची चर्चा फेटाळून लावली आहे, एक माध्यमाच्या वृत्तानुसार, आमची युती हा आमचा सामूहिक चेहरा आहे, असे शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. “केवळ एक व्यक्ती आपल्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनू शकत नाही. सामूहिक नेतृत्व हे आमचे सूत्र असून आमचे तिन्ही आघाडीचे भागीदार याबाबत निर्णय घेतील,” असे शरद पवार म्हणाले.

Leave a Comment