Sharad Pawar NCP : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; बीडमध्ये पंकजांविरुद्ध ‘या’ उमेदवाराला तिकीट

Sharad Pawar NCP Candidate List : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. यामध्ये आज (Sharad Pawar NCP Candidate List) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha Constituency) बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर लगेचच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बीड लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यात चर्चेत आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना (Pankaja Munde) उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात आधी पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे या खासदार होत्या. परंतु या वेळेस महायुतीने पंकजा मुंडे यांना तिकीट दिले. यानंतर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार दिला जाणार याची चर्चा होती.

Osmanabad Lok Sabha : धाराशिवचा उमेदवार ठरला! भाजप आमदाराच्या पत्नीला राष्ट्रवादीनं दिलं तिकीट..

Sharad Pawar NCP

उमेदवारी जाहीर होण्याआधी शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. या मतदारसंघातून उमेदवारीसाठी ज्योती मेटे इच्छुक होत्या. यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. परंतु शरद पवार गटाने आज बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली. मागील लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे यंदा त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला अशी माहिती मिळत आहे.

भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघात महायुतीने भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता दोन तगड्या उमेदवारात लढाई होणार आहे. शरद पवार गटाने याआधी वर्धा मतदार संघातून अमर काळे, दिंडोरी मतदारसंघातून भास्करराव भगरे, बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर आज शरद पवार गटाने आणखी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Sharad Pawar NCP

Ahmednagar Loksabha Election 2024 | तर विखे पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण? उठू लागल्या ‘त्यांच्या’ वावड्या

Leave a Comment