Sharad Pawar । शरद पवार गटाला आयोगाकडून पुन्हा मोठा दिलासा, निवडणुकीत होणार फायदाच फायदा

Sharad Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी महायुतीची साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. दोन्ही पक्षांचे नेते सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येतात.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणी चिन्हाचा मोठा फटका बसला आहे. कारण शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह अन् अपक्ष उमेदवारांना दिलेले पिपाणी चिन्ह जवळपास सारखेच दिसत होते, यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. शरद पवार गटाच्या उमेदवारांना ज्याचा खूप मोठा फटका बसला.

अशातच आता एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाकडून फक्त तुतारी आणि पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे. तर शरद पवार गटाचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह कायम ठेवलंय. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे फटका बसल्याचा आरोप शरद पवार गटाकडून सतत केला जात होता.

पिपाणी चिन्हामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर हे चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटाकडून केली होती. पिपाणी हे चिन्ह गोठवल्यानंतर शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान सातारा लोकसभेत शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे होते. चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस ते 32 हजार 771 मतांनी पराभूत झाले. पण याठिकाणी अपक्ष संजय गाडेंचं चिन्ह होतं पिपाणी, 37 हजार 62 मतं मिळाली.

Leave a Comment