Sharad Pawar । आरक्षणाच्या मुद्द्यांवरून शरद पवारांची आक्रमक भूमिका; म्हणाले, कोर्टात…

Sharad Pawar । आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्याचे वातावरण चांगलेच पेटले आहे. मराठा, धनगर आणि ओबीसी समाज आरक्षणाची मागणी करू लागला आहे. अशातच आता ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

नुकतेच बारामतीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार संबोधित करताना म्हणाले की, “मधोजी शिंदे धनगर आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. त्याला आम्ही पूर्ण मदत करणार आहोत,” असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, “आजचा सोहळा अतिशय महत्त्वाचा असून लोकांनी दिलेलं राज्य लोकांसाठी कसं वापरायचा याचा आदर्श अनेकांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करता येईल. देशात अनेक राजे झाले. पण 300 वर्षांनंतर सुद्धा त्याचं नाव लोक आदराने घेतात. सामान्य माणसांसाठी त्यांनी राज्य स्थापन केलं. भोसल्यांचे राज्य म्हणून कधी त्यांनी सांगितलं नाही. ते सामान्य रयतेचे राजे म्हणून वावरले. हा इतिहास आहे, ” असं शरद पवार म्हणाले.

“अहिल्याबाई होळकर यांच्यावर अनेक संकटं आली. तेव्हा त्यांनी धैर्य दाखवलं. आज धनगर समाज कष्टाळू समाज असून देशाच्या स्वतंत्रात योगदान मोठं होतं. या बारामतीत स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. जगन्नाथ कोकरे हे त्यासाठी तुरुंगात गेले. अनेकांची नाव सांगत येतील. मला 50 वर्ष राजकारणात साथ दिली. लोकांनी माझ्या मागे ताकद उभी केली. आज बारामती आपण अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने 500 कोटी खर्च करुन आपण मेडिकल कॉलेज करत आहोत,” असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

 

Leave a Comment