Shahrukh Khan: बॉलीवुड किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खानविरोध उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत राहणाऱ्या किरीट जसवंत शाह यांनी लखनौच्या तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. त्यांच्या फ्लॅटची किंमत करोडोंमध्ये होती. जसवंत यांनी या फ्लॅटसाठी आतापर्यंत 86 लाख रुपये भरले आहेत
मात्र आजतागायत त्यांना फ्लॅट मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी गौरी खानविरोधात एफआयआर दाखल केली आहे. कारण गौरी या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गौरी व्यतिरिक्त जसवंत शाह यांनी सीएमडी अनिल कुमार तुलसियानी आणि तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे संचालक महेश तुलसियानी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. या तिघांविरुद्ध कलम 409 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार जसवंत सांगतात की, गौरी खानच्या जाहिरातीमुळे प्रभावित होऊन त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला होता. एफआयआरची माहिती सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यातून मिळाली आहे. एकीकडे हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले आहे, तर दुसरीकडे गौरी ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने तिचे नावही या प्रकरणात ओढण्यात आल्याची माहिती नाही.
गौरी खान स्वतःचा डिझाईन ब्रँड चालवते
गौरी खान स्वतः इंटिरियर डिझायनर आहे. ती ‘गौरी खान डिझाइन्स’ नावाचा ब्रँड चालवते. या अंतर्गत तिने अनेक सेलिब्रिटी आणि स्टार्सची घरे आणि ऑफिस डिझाइन केले आहेत.
अलीकडे ती तिच्या कारमुळे चर्चेत आली होती. खरे तर गौरीने नवीन मर्सिडीज बेंझ घेतली आहे. या कारची किंमत लाखोंमध्ये सांगितली जात आहे.