Sesame Seeds Benefits : तिळात आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी खूप पोषक ठरतात. यामुळे हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवत नाही. तसेच दिवसातून एकदा चमचाभर तीळ खाल्ले, तर दातही मजबूत होतात.
त्याच्या पौष्टिक चवीशिवाय ते भरपूर आरोग्य फायदे प्रदान करते जे कोणत्याही आहारात समाविष्ट करणे योग्य बनवते. हे डिप किंवा ड्रेसिंग म्हणून वापरले जाते, विविध पदार्थांमध्ये चव जोडते.
जाणून घ्या तिळाचे आश्चर्यकारक फायदे
- हे लक्षात घ्या की तीळ हे निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहे, जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. इतकेच नाही तर तिळामुळे बद्धकोष्ठता टाळतात आणि चयापचय सुधारतात.
- तिळामध्ये मेथिओनाइन असते, जे यकृत निरोगी ठेवण्याबरोबरच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करते.
तिळात आढळणारा आणखी एक घटक म्हणजे ट्रिप्टोफॅन होय. ट्रिप्टोफॅन मुळे चांगली झोप लागते आणि त्वचेचे तसेच केसांचे देखील चांगले पोषण होते. - पांढऱ्या तीळात कॅल्शियम भरपूर असून काळ्या आणि लाल तिळात मोठ्या प्रमाणात लोह असते, जे ॲनिमियावर उपचार करण्यास खूप मदत करते.तिळाच्या बियांमध्ये लेसिथिन असते आणि स्मरणशक्ती वाढवणारे गुणधर्म आढळत असतात.
- तीळाच्या सेवनाने स्तनपान करणाऱ्या मातांच्या दुधाची गुणवत्ता चांगले राहते.
अशा प्रकारे करा तिळाचा वापर
- तुम्ही सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता.
- एक चमचा थेट चावून खाऊ शकता. याद्वारे देखील तुम्हाला सर्व पोषण मिळते.
- तसेच तुम्हाला ते दुधात उकळूनही वापरू शकता.
- इतकेच नाही तर तुम्ही पिठात मिसळून चपाती बनवून खाऊ शकता.