September Bank Holiday : ऑगस्ट महिना संपत आला आहे. अवघ्या दोन दिवसांत नवीन महिना सुरू होणार आहे. पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये (September Bank Holiday) बँकेत जाण्याचा तुमचा विचार असेल तर बँकेच्या सुट्ट्यांची माहिती घेऊनच कामाचे नियोजन करा. कारण, या महिन्यात बँकेला जास्त दिवस सुट्ट्या असणार आहेत. सप्टेंबरमध्ये विविध प्रसंगी एकूण 16 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये प्रत्येक रविवारसह प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्ट्यांचाही समावेश आहे.
रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आहेत. यामुळे आणखी सुट्ट्या असतील. कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी हे सण सप्टेंबरमध्येच येतील. येथे हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे की सप्टेंबरमध्ये देशभरातील बँका 16 दिवस बंद राहणार नाहीत. अनेक सुट्ट्या राष्ट्रीय पातळीवरच्या असतात. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. त्याच वेळी काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवर दिल्या जातात. स्थानिक सुट्टीच्या दिवशी, बँक शाखा फक्त संबंधित राज्यांमध्ये बंद असतात. त्यामुळे पंजाबमध्ये ज्या दिवशी बँका बंद होतील त्याच दिवशी महाराष्ट्रातही बँका बंद असतील असे काही नाही.
रविवार 3 सप्टेंबर 2023 रोजी देशभरात बँका बंद राहतील. 6 सप्टेंबरला भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पाटणा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बँका बंद राहतील. 7 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अहमदाबाद, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, तेलंगणा, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनौ, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
9 सप्टेंबर 2023 च्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील. रविवार 10 सप्टेंबर रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर पुढील आठवड्यातील रविवारी १७ सप्टेंबर रोजी देशभरात बँका बंद राहतील. बंगळुरू, तेलंगणा येथे 18 सप्टेंबर रोजी विनायक चतुर्थीनिमित्त बँका बंद राहतील.
19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी येथे बँका बंद राहतील. कोची आणि भुवनेश्वरमध्ये 20 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्ताने बँका बंद राहतील. 22 सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त कोची, पणजी आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील. 23 सप्टेंबरचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. रविवार 24 सप्टेंबर रोजी बँका बंद राहतील. 25 सप्टेंबर रोजी श्रीमंत शंकरदेव जयंतीनिमित्त गुवाहाटीतील बँकांना सुट्टी असेल.
27 सप्टेंबर 2023 रोजी जम्मू, कोची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील. 28 सप्टेंबर रोजी अहमदाबाद, ऐजॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इंफाळ, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची येथे बँका बंद राहतील. 29 सप्टेंबर रोजी गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.