SEBI News : भांडवली बाजार (Capital market) नियामक सेबीने (SEBI) बॉम्बे डाईंग (Bombay Dying), सनस्टार रिअॅल्टी (Sunstar Realty) आणि रेलिगेअर फिनव्हेस्टच्या (Religare Finvest) प्रकरणात ८२ कंपन्या आणि त्यांच्या संलग्न कंपन्यांना २२.६४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंगळवारी सेबीने सांगितले की, रेलिगेअरमधील पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी फोर्टिस हेल्थकेअर (Fortis health care) आणि इतरांना दोन लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम ४५ दिवसांत भरायची आहे.
- Q2 Result : “या” कंपनीचा एकत्रित वार्षिक नफा ६८.५% वाढून १६७७.४८ कोटी रुपयांवर पोहोचला
- Market Updates : म्हणून परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII’s) केली १ अब्ज डॉलरचे गुंतवणूक
- IPO Beaking : लवकरच येणार “या” चार कंपन्यांचे आयपीओ
- Business Deal : शिबाशिष सरकारने १४० दशलख डॉलर देऊन खरेदी केल्या “या” दोन कंपन्या
बाजार नियामकाच्या आदेशानुसार, पूर्वीच्या प्रवर्तकांच्या फायद्यासाठी रेलिगेअर एंटरप्रायझेस (Religare Enterprises – REL) चे निधी त्याच्या उपकंपनी रेलिगेअर फिनवेस्ट (Religare Finvest – RFL) मार्फत हस्तांतरित करण्यात आले. यासोबतच त्याचे प्रवर्तक मालविंदर आणि शिविंदर मोहन सिंग यांनीही आरएफएलकडून (RFL) घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी निधीचा गैरवापर केला.
३९० पानांच्या आदेशात म्हटले आहे की संपूर्ण फसवणूक योजनेअंतर्गत २,४७३.६६ कोटी रुपये रेलिगेअरला हस्तांतरित करण्यात आले. यापैकी आरएफएलच्या ४८७.९२ कोटी रुपयांचा गैरवापर झाला. रेलिगेअर एंटरप्रायझेसची (REL) रेलिगेअर फिनवेस्टमध्ये (RFL) ८५.६४ टक्के हिस्सेदारी आहे.
बॉम्बे डाईंग प्रकरणी ९ जणांवर एकूण ५९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे सर्व लोक कंपनीच्या ऑडिट कमिटीचे (Audit committee) सदस्य आणि सीएफओ (CFO) होते. या लोकांनी २०१२ ते २०१९ या आर्थिक वर्षांच्या आर्थिक विवरणांसाठी योजना चुकीच्या पद्धतीने मांडल्या. यामध्ये महसूल (Revenue) आणि नफ्याचे चुकीचे आकडे दाखविण्यात आले.
याआधी ऑक्टोबरमध्ये सेबीने १० व्यक्ती आणि कंपन्यांना शेअर मार्केटमध्ये (Share market) ट्रेडिंग (Trading) करण्यावर बंदी घातली होती. यामध्ये बॉम्बे डाईंगचे प्रवर्तक नुस्ली वाडिया, नेस वाडिया आणि जेह वाडिया यांचा समावेश होता. त्यांच्याकडून १५.७५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सनस्टार रियल्टीमधील (Sunstar Realty) एकूण २१ जणांना १.०५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे लोक कंपनीच्या शेअर्समध्ये जुगार खेळायचे, त्याची किंमत कमी करायचे तसेच वाढवायचे. या सर्वांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जून २०१५ ते मार्च २०१६ दरम्यान सेबीने याची चौकशी केली होती.