Scooty Under Rs 1 Lakh : भारीच! 1 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘या’ जबरदस्त स्कुटर, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Scooty Under Rs 1 Lakh : भारतीय बाजारात उत्कृष्ट स्कूटी 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. जर तुम्हाला स्वस्तात स्कुटर खरेदी करायच्या असतील तर लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा लागणार आहे.

Honda Activa 6G

Honda Activa 6G 109.5cc पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे, जे 7.73 bhp आणि 8.90 Nm आउटपुट जनरेट करत असून त्याची किंमत 93,116 रुपयांपासून सुरू होते आणि 1.00 लाख रुपयेपर्यंत जाते.

TVS स्कूटी पेप प्लस

TVS ची ही स्कूटर स्कूटी पेप प्लस आणि स्कूटी झेस्ट मॉडेल्सच्या स्वरूपात उपलब्ध असून स्कूटरमध्ये 87.8cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 5.4 bhp आणि 6.5 Nm टॉर्क जनरेट करते, तर Zest व्हेरियंटमध्ये सर्वात शक्तिशाली 110cc इंजिन देण्यात आले आहे जे 7.71 bhp आणि 8.8 Nm टॉर्क जनरेट करू शकते. किमतीचा विचार केला तर मुंबईत त्याची ऑन रोड किंमत ८३,३४२ रुपयांपासून सुरू होते.

हिरो प्लेजर प्लस

Hero भारतात Pleasure Plus आणि Pleasure Plus Xtec ऑफर करत असून हे दोन्ही मॉडेल्स 111cc पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहेत, जे 8 bhp आणि 8.7 Nm पीक पॉवर आणि टॉर्क निर्माण करतात. किमतीचा विचार केला तर त्यांची किंमत 89,124 रुपये ते 1.02 लाख रुपये (ऑन-रोड, मुंबई) आहे.

होंडा Dio

नवीन Honda Dio तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध असून तिच्या स्पोर्टी हाताळणी आणि आरामदायी राइडमुळे ती भारतीय रायडर्समध्ये सर्वात लोकप्रिय आहे. Honda Dio मध्ये 110cc इंजिन देण्यात आले आहे जे 7.75 bhp आणि 9Nm टॉर्क जनरेट करते. किमतीचा विचार केला तर Honda Dio 110 ची किंमत रु. 89,227 पासून सुरू होते आणि रु. 97,666 पर्यंत जाते

Hero Zoom

Hero Zoom, जे जास्त वैशिष्ट्यांसह येते, त्यात 110cc इंजिन दिले असून जे 8 bhp आणि 8.7 Nm पीक टॉर्क देते. किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 91,054 रुपये ते 1.05 लाख रुपये आहे.

TVS ज्युपिटर

ज्युपिटरचे दोन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध असून बेस मॉडेल 110cc इंजिनसह सुसज्ज आहे जे 7.77 bhp आणि 8.8 Nm चे आउटपुट जनरेट करते. अधिक शक्तिशाली 125cc युनिट 8 bhp आणि 10.5 Nm आउटपुट तयार करत असून त्याच्या 110cc मॉडेलची ऑन-रोड किंमत 97,299 रुपयांपासून सुरू होते.

Leave a Comment