School Closed । मोठी बातमी! पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी, अतिमुसळधार पावसामुळे घेतला निर्णय

School Closed । सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. राज्याच्या काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे तर अनेक भागात अजूनही पावसाने दडी मारली आहे. दरम्यान, यंदा पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अशातच आता पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अतिमुसळधार पावसामुळे पुणे, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याकडून मुंबई आणि उपनगरात पावसाचा रेट अलर्ट जाहीर केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नवी मुंबई महापालिकेनं आज शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिला आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं उद्याही शाळांना सुट्टी जाहीर केली असून याबाबत काढलेल्या परिपत्रकात असं म्हटलं की, सध्याच्या स्थितीत जिल्हात सुरु असलेली अतिवृष्टी विचारात घेता हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार पहिली ते १२ पर्तंतच्या सर्व माध्यमांच्या आणि मंडळांच्या शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. शाळेत जाताना तसेच येताना विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला आहे.

शिवाय आज सिंधुदुर्गातील सर्वच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे.

मागील ४८ तासांपासून संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. सखल भागात देखील पावसाचं पाणी साचले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांना पावसातून वाट काढावी लागत आहे. काही ठिकाणी तर अतिवृष्टीमुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आहे. अनेक घरांत पावसाचं पाणी साचलं आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment