Scheme For Farmer । शेतकऱ्यांना शेती करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खास शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. कोणत्या आहेत या योजना जाणून घ्या.
पंतप्रधान पीक विमा योजना
अनेकदा शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी अनेकवेळा शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील नुकसानीची भरपाई देण्यात येते आणि त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना
शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी सिंचन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. या योजनेंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य त्या सुविधा पुरवण्यात येतात. योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात पाण्याचे स्प्रिंकलर, ठिबक सिंचन यंत्रणा तसेच इतर सिंचन उपकरणे बसवता येतात.
प्रधानमंत्री कुसुम योजना
विजेची समस्या लक्षात घेऊन सरकारने कुसुम योजना सुरू केली होती. या योजनेत शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाते, त्यासाठी त्यांना अनुदानही देण्यात येते. या सोलर पॅनलमुळे शेतकरी सहजपणे वीज निर्मिती होते आणि उत्पादित वीज विकून उत्पन्न मिळवू शकतात. या योजनेंतर्गत शेतकरी सौर पंप खरेदी करू शकतात.
किसान क्रेडिट कार्ड योजना
क्रेडिट कार्ड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना असून किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत केली जाते. विशेष म्हणजे क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी शेतीसाठी सहज कर्ज घेऊ शकतात. यातील व्याजदर खूप कमी आहे. क्रेडिट कार्ड हा एक प्रकारचा कार्ड असून ज्यात शेतकऱ्यांना क्रेडिट मर्यादा दिली जाते जी ते त्यांच्या कृषी क्रियाकलापांमध्ये वापरू शकतात. शेतकऱ्यांना ही रक्कम ठराविक वेळेनंतर भरावी लागते, जर शेतकऱ्यांनी वेळेवर बिल भरले नाहीत तर त्यांच्यावर नगण्य व्याज आकारले जाते.