SBI : SBI ने दिला करोडो ग्राहकांना इशारा! नेमकं कारण काय? जाणून घ्या…

SBI : SBI ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी सतत अनेक सुविधा ऑफर करत असते. या बँकेचे करोडो ग्राहक आहेत. जर तुम्हीही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना इशारा दिला आहे.

बँकेने दिला सल्ला

एका पोस्टमध्ये, SBI बँकेने असे म्हटले आहे की फसवणूक करणारे एसबीआय रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता करण्यासाठी SMS आणि WhatsApp वर APK आणि संदेश पाठवत आहेत. हे लक्षात घ्या की बँक कधीही एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवर लिंक किंवा नको असलेले Apk पाठवत नाही.

एसबीआयने आपल्या ग्राहकांना अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये किंवा अनोळखी फायली डाउनलोड करू नये, असा मोलाचा सल्ला दिला आहे.APK ही एक ऍप्लिकेशन फाइल असून ती Android ऑपरेटिंग सिस्टममध्ये डिव्हाइसवर स्थापित करून वापरली जाते.

SBI ने आपल्या चेतावणी संदेशात म्हटले आहे की SBI बँकांच्या ग्राहकांनी सावध राहावे. फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा. एसबीआय रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता करण्यासाठी फसवणूक करणारे एपीके आणि एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवर संदेश पाठवत असल्याचे समोर आले आहे. पण हे लक्षात घ्या की SBI कधीही SMS किंवा WhatsApp वर लिंक्स किंवा अशा ॲप्स शेअर करत नाही. अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि अशी कोणतीही फाईल डाउनलोड करू नका.

असे करा SBI रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम?

  • तुम्हाला सर्वात अगोदर https://www.rewardz.sbi/ वर जा आणि “नवीन वापरकर्ता” पर्यायावर जावे लागेल.
  • आता तुमचा SBI Rewards ग्राहक आयडी एंटर करा
  • पुढे तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मिळालेला वन टाइम पासवर्ड टाका.
  • त्यानंतर आता तुमचे वैयक्तिक तपशील सत्यापित करा आणि रिडीम करा.
  • हे लक्षात घ्या की तुम्ही हे रिवॉर्ड पॉइंट्स मॉल, मोबाइल/डीटीएच रिचार्ज, मूव्ही तिकिटे, एअरलाइन तिकिटे, हॉटेल बुकिंग आणि इतर अनेक उत्पादने आणि सेवांवर वापरू शकता.

Leave a Comment