SBI SCO Recruitment 2024 : सध्याच्या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अनेक बँकेत, विविध विभागात नोकरीची संधी असते. पण अनेक उमेदवारांना या पदांबाबत माहिती नसते, त्यामुळे त्यांना अर्ज करता येत नाही. जर तुम्हीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. SBI स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरतीची घोषणा झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 131 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. जर तुम्हाला या बँकेत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे.
जाणून घ्या भरती तपशील
सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक) – २३
उपव्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक) – ५१
व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक)- ०३
व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक) – ५०
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार (CDBA) – ०१
सहाय्यक महाव्यवस्थापक (ॲप्लिकेशन सिक्युरिटी) – ०३
एकूण – 131
किती आहे फी?
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणींसाठी अर्ज शुल्क 750 रुपये ठेवले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, PWD उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने फी भरता येईल.
वयोमर्यादा
SBI स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर भरतीमध्ये पदांनुसार वयोमर्यादा कमाल 60 वर्षे आहे. या भरतीमध्ये, 1 डिसेंबर 2023 हा आधार मानून वयाची गणना करण्यात येणार आहे. हे लक्षात घ्या की राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत देण्यात आली आहे.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे ठेवले आहेत.
आवश्यक कागदपत्रे
दहावीची गुणपत्रिका
बारावीची गुणपत्रिका
पदवी गुणपत्रिका
जात प्रमाणपत्र
उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी
आधार कार्ड
उमेदवाराचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
असा करा अर्ज
आता तुम्ही सोप्या पद्धतीने SBI भरतीसाठी अर्ज करू शकता
सर्वात अगोदर बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून सबमिट करा.
पुढे आता लॉगिन करा आणि फॉर्म भरा.
यानंतर फी भरून अर्ज सबमिट करा.
आता फॉर्मची एक प्रत डाउनलोड करून ती तुमच्याकडे ठेवा.