SBI schemes । अनेकजण गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. करतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी गुंतवणूकदारांची पहिली पसंती स्टेट बँक ऑफ इंडियाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी काही योजना ऑफर करते.
या बँकेने अमृत कलश योजना विशेष एफडी योजना सुरू केली असून या योजनेत गुंतवणुकीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. या FD चा कालावधी ४०० दिवसांचा असेल. यात ग्राहकाला ७.१० टक्के व्याज मिळत आहे. हे लक्षात घ्या की या योजनेत हमी व्याज उपलब्ध आहे. गुंतवणूकदार त्रैमासिक, मासिक किंवा अर्धवार्षिक व्याज पेमेंटचा कोणताही पर्याय निवडू शकतात.
SBI WeCare FD योजना खूप लोकप्रिय असून यात उच्च व्याजदर दिला जातो. योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ०.५ टक्के अतिरिक्त व्याज मिळते. गुंतवणूकदारांना एफडी योजनेत ७.५० टक्के व्याज मिळेल. या FD योजनेतील गुंतवणूक किमान ५ वर्षे आणि कमाल १० वर्षांसाठी आहे.
या बँकेची अमृत दृष्टी एफडी योजना देखील आहे. या योजनेचा कालावधी ४४४ दिवसांचा असून बँक ७.२५ टक्के व्याज देत आहे. या योजनेतही ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळेल. या योजनेत जास्तीत जास्त ३ कोटी रुपये गुंतवता येतात.
SBI सर्वोत्तम FD योजना अनेक सरकारी योजनांच्या तुलनेत जास्त व्याज देत असून हे लक्षात घ्या की या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त १ किंवा २ वर्षांची योजना आहे. याचा अर्थ कमी कालावधीत मोठा फायदा. या योजनेत ग्राहकाला ७.४ टक्के व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६ टक्के व्याज मिळते.