मुंबई : पेमेंट बँकांच्या व्यवसायातील मंदीचा परिणाम (slowdown in the business of payment banks) अशा बँका सुरू करण्याच्या विचारात असलेल्या कंपन्यांवर होऊ लागला आहे. जिओ पेमेंट्स बँकेचे (Jio Payments Bank) ताजे उदाहरण आहे. काही ठोस बिजनेस आयडिया आकारास येत नसल्याने रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आपले Jio पेमेंट्स बँक याचे ऑपरेशन्स पूर्णपणे सुरू केले नाही. म्हणून मग वैतागलेल्या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) यांनी रिलायन्सचे पाय मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
Pakistan News: पुन्हा हादरले पाकिस्तान; पहा कुठे झालाय आणखी एक हल्ला..! https://t.co/X3tqnRPl05
— Krushirang (@krushirang) May 17, 2022
वास्तविक, SBI ची Jio पेमेंट्स बँकेत भागीदारी आहे. परिस्थिती अशी आहे की, 5 वर्षांच्या कराराला 4 वर्षे उलटूनही एसबीआयला रिलायन्स इंडस्ट्रीजकडून कोणतीही व्यवसाय योजना मिळालेली नाही. याला गांभीर्याने घेत एसबीआयने एकतर कंपनीने लवकरच व्यवसाय योजना द्यावी किंवा त्यांनी करारातून बाहेर पडावे, असा अल्टिमेटम दिला आहे. खरं तर अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतरही, Jio पेमेंट्स बँक पूर्णपणे सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता SBI या भागीदारीतून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. (SBI is planning to exit from this partnership) एका बातमीनुसार, एसबीआयने आता रिलायन्सला अल्टिमेटम दिला आहे की, जर त्यांनी पेमेंट्स बँकेशी संबंधित बिझनेस प्लॅन लवकरच न दिल्यास संयुक्त उपक्रमातून बाहेर पडण्यास भाग पाडले जाऊ शकते. जिओ पेमेंट्स बँकेचा ठोस व्यवसाय योजना आणण्यात रिलायन्स बर्याच काळापासून अडकले आहे. या बँकेचा औपचारिक शुभारंभ 4 वर्षांहून अधिक काळ लांबणीवर पडला आहे. Jio पेमेंट्स बँकेचा पाया एप्रिल 2018 मध्ये घातला गेला आणि हा SBI आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा संयुक्त उपक्रम आहे. दोघांमधील पाच वर्षांचा करार पुढील वर्षाच्या सुरुवातीला संपेल.
Health Tips: सर्दी-खोकल्याला करा बाय..बाय; पुढील 10 घटकांचे करा नियमित सेवन https://t.co/kq89Dljgir
— Krushirang (@krushirang) May 17, 2022
एसबीआयच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रिलायन्सने सप्टेंबरपर्यंत पेमेंट बँकेबाबत व्यवसाय योजना देण्याचे आश्वासन दिले आहे. तोपर्यंत तसे झाले नाही, तर त्यांना स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल. खरे तर असे झाले की या पेमेंट बँकेच्या माध्यमातून एसबीआय आणि आरआयएल इतर पेमेंट कंपन्यांच्या व्यवसायात घुसण्याचा विचार करत होते. याचा फायदा फक्त जिओ पेमेंट्स बँकेला मिळेल. एसबीआयचे काम जिओ पेमेंट्स बँकेला उत्पादनांची रचना आणि या विभागातील कौशल्यासह त्याच्या जबरदस्त नेटवर्कचा फायदा देणे हे होते, परंतु, हे सर्व झाले नाही. UPI मुळे पेमेंट बँकांचा व्यवसाय निरुपयोगी झाला आहे. सुमारे 6 वर्षांपूर्वी आरबीआयने 11 पेमेंट बँक परवाने दिले होते. सध्या फक्त 6 पेमेंट बँक उरल्या आहेत म्हणजेच कंपन्यांना या पेमेंट बँकांमध्ये कमाई करण्याचा विश्वास नाही. रिलायन्सलाही हीच गोष्ट खटकत आहे. आता सप्टेंबरपर्यंत रिलायन्सला जिओ पेमेंट्स बँकेचा प्लॅन द्यायचा आहे. त्यानंतरच ही बँक खरोखरच ग्राउंड रिअॅलिटी होईल की नाही हे कळेल. (SBI’s job was to give the advantage of its tremendous network to Jio Payments Bank)
Subsidy Scheme: ‘त्या’ योजनेत मिळते 90 % अनुदान; पहा कसा घ्यायचा लाभ https://t.co/b5CrdTGCRR
— Krushirang (@krushirang) May 17, 2022