SBI hikes interest Rates: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात २० बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. बँकेच्या वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीवर ही वाढ करण्यात आली आहे. नवीन व्याजदर २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू होतील. बँकेच्या वेबसाइटनुसार, FD वर वाढलेले व्याजदर १५ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होतील. बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, एफडीवरील व्याजदर १० बेसिस पॉइंट्स ते २० बेस पॉइंट्स दरम्यान वाढतील.
FD वर नवीन व्याजदर काय आहेत?
SBI मध्ये ४६ दिवसांपासून ते १७९ दिवसांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वरील व्याजदर आता ४ टक्के दराने उपलब्ध असतील. यापूर्वी या कालावधीसाठी ३.९० टक्के व्याजदर होता. व्याजदरातील बदलानंतर, १८० दिवस ते २१० दिवसांच्या कालावधीसह किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदर ४.५५ टक्क्यांवरून ४.६५ टक्के करण्यात आला आहे.
बँकेने २११ दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी ठेवीवरील व्याजदर ४.६० टक्क्यांवरून आता ४.७० टक्के केला आहे. SBI रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिट खात्यांवरील एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीवरील व्याजदर आता ५.४५ टक्क्यांवरून ५.६० टक्के झाला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठीचेही वाढले व्याजदर
याशिवाय, दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर व्याजदर ५.५० टक्क्यांवरून ५.६५ टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, तीन वर्ष ते पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ५.६० टक्क्यांवरून ५.८० टक्के झाला आहे. तर, पाच वर्ष ते १० वर्षांच्या मुदतीच्या एफडीवरील व्याजदर ५.६५ टक्क्यांवरून ५.८५ टक्के करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी, ७ दिवस ते ४५ दिवसांच्या मुदत ठेवींवर आता ३.५ टक्के दराने व्याज मिळेल. यापूर्वी या कालावधीसाठी ३.४० टक्के व्याजदर होता. त्याच वेळी ४६ दिवस ते १७९ दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ४.४० टक्क्यांवरून ४.५० टक्के करण्यात आला आहे.
- Must Read:
- Small Business Idea For Diwali : दिवाळीत सुरू करा ‘हे’ छोटे व्यवसाय, भरभराट होईल हमखास..
- Ayurveda Health Tips: पचनशक्ती होऊ लागेल कमजोर ,रात्रीच्या जेवणात ठेवा ” या ” 5 पदार्थांपासून अंतर
- Agriculture News: लम्पी त्वचारोगाचा धोका कधी संपणार; पशुपालकांना लागली आहे चिंता