SBI FD : गुंतवणूकदारांनो, SBI एफडीवर देत आहे बंपर व्याज! त्वरित करा गुंतवणूक

SBI FD : जर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, तुम्ही जर SBI मध्ये गुंतवणुक केली तर तुम्हाला शानदार परतावा मिळेल. काय आहे बँकेची योजना जाणून घ्या.

हे लक्षात घ्या की, SBI ची ‘अमृत कलश’ योजनेची खास गोष्ट म्हणजे ती FD वर 400 दिवसांसाठी 7.6 टक्के दराने व्याज देत आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना कमी वेळेत जास्त व्याज मिळत आहे.

अमृत ​​कलश योजनेत मिळेल 7.60 टक्के व्याज

SBI च्या मतानुसार, बँकेच्या अमृत कलश स्पेशल FD स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना ७.१०% व्याजदर मिळत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याजदर देण्यात येईल. हे लक्षात घ्या की या योजनेतील गुंतवणूक ३१ मार्च २०२३ पर्यंत असून या कालावधीत तुम्ही ही योजना ऑनलाइन किंवा ऑफलाइन बुक करू शकते. अमृत ​​कलश याच्या बदल्यात गुंतवणूकदारांना बँक कर्ज सुविधा देखील प्रदान करत असून आता तुम्हाला अमृत कलश योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करता येईल.

अमृत कलश स्पेशल स्कीम

बँकेच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये 400 दिवसांच्या कालावधीसह गुंतवणूक करता येईल आणि तुम्ही हमी परतावा देखील मिळवू शकतो. SBI बँकेच्या मतानुसार, अमृत कलश एफडी गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक आणि सहामाही व्याज पेमेंट घेऊ शकतात.

विशेष म्हणजे SBI अमृत कलशच्या मॅच्युरिटीवर, TDS कापल्यानंतर व्याजाचे पैसे ग्राहकाच्या खात्यात जोडण्यात येतात. SBI वेबसाइटनुसार, अमृत कलश FD मध्ये जमा केलेले पैसे 400 दिवसांच्या कालावधीपूर्वी काढले गेले तर बँक दंड म्हणून लागू दरापेक्षा 0.50% ते 1% कमी व्याजदर वजा करू शकते.

Leave a Comment