SBI : एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर तसेच योजना घेऊन येत असते. या योजना ग्राहकांसाठी खूप फायद्याच्या असतात. जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला आता बँकेच्या एका योजनेचा लाभ घेता येणार नाही.
तुम्हाला SBI अमृत कलश योजना आणि वेकेअर योजनेचे लाभ फक्त 31 तारखेपर्यंतच घेऊ शकता. या योजनांमध्ये तुम्हाला ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजाचा लाभ मिळतो.
SBI अमृत कलश योजना
स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना विशेष एफडी सुविधा देत असून अमृत कलश असे या एफडीचे नाव आहे. यात गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. या योजनेत 400 दिवसांच्या FD वर 7.10 टक्के दराने व्याज मिळत असून यात परताव्याची हमीही असते.
या योजनेत फिक्स डिपॉझिटच्या मॅच्युरिटीवरच व्याज देण्यात येते. समजा तुम्ही 400 दिवसांसाठी मुदत ठेव ठेवली आहे आणि त्यापूर्वी तुम्ही पैसे काढल्यास ठेव रक्कम काढल्यावर व्याज दंड म्हणून 0.50 ते 1 टक्के रक्कम कापण्यात येते.
एसबीआय वी केअर एफडी योजना
WeCare योजनेची सुविधा स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे प्रदान केली आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ 31 मार्चपर्यंतच घेता येईल. SBI ग्राहकांना WeCare FD वर जास्त व्याजाचा लाभ मिळत असून SBI च्या या योजनेत 7.50 टक्के दराने व्याज देण्यात येते.
ही एक प्रकारची देशांतर्गत मुदत ठेव योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही किमान 5 वर्षे आणि कमाल 10 वर्षांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करता येईल. या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्जाची सुविधा मिळते. परिपक्वतेवर व्याजाचा लाभ मिळतो.
SBI WeCare ज्येष्ठ नागरिक FD योजना मे 2020 मध्ये लाँच केली होती, जी नंतर अनेक वेळा वाढवली आहे. SBI ने विशेष FD योजना सुरू केली होती, ज्याचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुदत ठेवींवर जास्त व्याज देणे हा होता.