SBI : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. बँकेने पुन्हा एकदा FD व्याजदर वाढवले आहेत. ज्याचा तुम्हाला आर्थिक लाभ होईल. जाणून घ्या सविस्तर माहिती.
हे लक्षात घ्या की स्टेट बँक ऑफ इंडियाने 180 दिवसांपासून 210 दिवसांच्या कालावधीसाठी सामान्य ग्राहकांसाठी व्याजदर 5.75% वरून 6% पर्यंत 25 bps ने वाढवला असून या बँकेने 211 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD चा दर सामान्य ग्राहकांसाठी 6% वरून 6.25% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50% वरून 6.75% वाढवला आहे
जाणून घ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळणारा व्याजदर
या बँकेने 7 ते 45 दिवसांच्या बल्क डिपॉझिटवरील व्याजदरात 25 बेस पॉइंट्सने वाढ केली असून सामान्य ग्राहकांसाठी दर 5% वरून 5.25% पर्यंत वाढला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, बँकेने याच कालावधीत व्याजदर 5.50% वरून 5.75% पर्यंत वाढवला आहे.
इतकेच नाही तर 46 दिवस ते 179 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर सामान्य नागरिकांना 5.75% ऐवजी 6.25% पर्यंत व्याजदर देण्यात येणार आहे. या कालावधीसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 6.25% वरून 6.75% केला आहे.
10 bps ची वाढ
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या बँकेने सामान्य ग्राहकांसाठी 10 bps ची मुदत 180 दिवसांवरून 210 दिवसांपर्यंत वाढवली आहे. तो 6.50% वरून 6.60% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7% वरून 7.10% इतका झाला आहे. तसेच बँकेने एक ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 6.80% वरून 7% पर्यंत 20 bps ने वाढवला आहे.
दोन वर्षापासून 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, बँकेने सामान्य ग्राहकांसाठी दर 6.75% वरून 7% पर्यंत वाढवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने व्याजदर 7.25% वरून 7.50% इतका केला आहे.