SBI Bank Account Opening: मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आता डिजिटल बँकिंगला (digital banking account opening information in marathi) प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ग्राहकांना नेट बँकिंग, फोन बँकिंग, मोबाईल बँकिंगनंतर (net banking, phone banking, mobile banking) आता एसबीआयने ग्राहकांसाठी डिजिटल बचत खाते उघडण्याची सुविधा आणली आहे. आता जर एखाद्या व्यक्तीला SBI मध्ये खाते उघडायचे असेल तर त्याला शाखेत जाण्याची गरज नाही. आता नागरिक SBI च्या डिजिटल अॅप YONO द्वारे घरबसल्या खाते उघडू शकतात.
डिजिटल युगात लोकांना बँकेत जावंसं वाटत नाही. लोकांना त्यांच्या फोनद्वारे सर्व सुविधांचा लाभ घ्यायचा आहे. जवळपास सर्वच बँकांनी फोनद्वारे बँकिंग सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. स्टेट बँकेनेही हे सुरू केले आहे. एसबीआयमध्ये डिजिटल बचत खाते उघडण्यासाठी (facility of opening a digital savings account for the customers) ग्राहकांना कोणतीही कागदपत्रे करण्याची गरज नाही. (digital savings account in SBI) स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
SBI ने सांगितले की, कोणताही नागरिक त्याच्या मोबाईलमध्ये YONO SBI अॅप डाउनलोड करून कधीही, कुठेही डिजिटल बचत खाते उघडू शकतो. या माध्यमातून खाते उघडण्यासाठी ग्राहकांना एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जावे लागणार नाही. डिजिटल बचत खाते उघडण्यासाठी ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे कागदोपत्री काम पूर्ण करण्याची गरज भासणार नाही. डिजिटल बचत खाते ऑपरेट करण्यासाठी, ग्राहकांना OTP आधारित प्रमाणीकरणाची सुविधा मिळते. सर्व बँकिंग सेवा सहज उपलब्ध आहेत.
खाते उघडण्याची प्रक्रिया YONO द्वारे डिजिटल बँक खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम (Account Opening Process To open a digital bank account through YONO) YONO अॅप उघडा. त्यानंतर तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावा लागेल. यात तुमचे ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल, ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागेल आणि मग आधार क्रमांक. (e-KYC : enter your mobile, email id and aadhaar number, PAN details and other personal details information) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. ते प्रविष्ट केल्यानंतर ग्राहकांना पॅन तपशील आणि इतर वैयक्तिक तपशीलांची माहिती प्रविष्ट करावी लागेल. मग तुम्ही ते सबमिट करा. तुमची डिजिटल खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.