SBI ATM । जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. SBI ATM कार्डमधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाते, त्यामुळे ATM वापरण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या.
स्टेट बँक ऑफ इंडिया देखील हे शुल्क आकारत असून SBI चे शुल्क व्यवहाराचे स्वरूप आणि शहराच्या प्रकारावर अवलंबून असते. मेट्रो आणि सामान्य शहरांसाठीचे शुल्क वेगळे आहे. एसबीआय एटीएम कार्डधारकाने एसबीआय एटीएम कार्ड वापरून इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तर त्याला जास्त पैसे मोजावे लागतील. प्रत्येक बँक ग्राहकाला एटीएम कार्डच्या शुल्काविषयी माहिती असावे.
SBI ATM मोफत व्यवहार
बँक आपल्या ग्राहकांना स्वतःच्या ATM तसेच इतर बँकांच्या ATM मध्ये काही अटींच्या अधीन राहून अमर्यादित मोफत ATM व्यवहार ऑफर करत असून एसबीआय सेव्हिंग बँक खात्यात 25,000 रुपयांपेक्षा अधिक मासिक शिल्लक ठेवणारे ग्राहक बँकेच्या एटीएम नेटवर्कमध्ये अमर्यादित एटीएम व्यवहार करू शकतात. इतर बँकांच्या एटीएममध्ये या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, एसबीआय ग्राहकाला 1 लाख रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत.
SBI खात्यात 1 लाख रुपयांपर्यंतची मासिक शिल्लक असणाऱ्या ग्राहकांना देशातील सहा मेट्रो शहरांमध्ये म्हणजे मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबादमधील इतर बँकांच्या एटीएममधून 3 विनामूल्य व्यवहार करता येते. इतर शहरांमध्ये सहा व्यवहार मोफत करता येणार आहेत.
एखाद्या SBI बँक खातेधारकाने त्याच्या खात्यात 25,000 रुपये मासिक शिल्लक ठेवल्यास त्याला SBI ATM मध्ये एका महिन्यात पाच विनामूल्य व्यवहार मिळतील. ज्यांच्या खात्यात 25000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे त्यांना अमर्यादित व्यवहारांची सुविधा मिळेल. जर एसबीआय खातेधारकाला इतर बँकांमध्येही अमर्यादित एटीएम व्यवहार करायचे असल्यास त्याला 1 लाख रुपये मासिक सरासरी शिल्लक ठेवावी लागणार आहे.
एसबीआयने निर्धारित केलेल्या मर्यादेनंतर ग्राहकाने एटीएम व्यवहार केला तर त्याला शुल्क भरावे लागेल. तुम्ही SBI व्यतिरिक्त कोणत्याही बँकेचे ATM वापरत असल्यास, तुम्हाला प्रति आर्थिक व्यवहारासाठी 20 रुपये द्यावे लागतील. यावरही जीएसटी लागू होणार आहे. एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा इतर कोणताही व्यवहार करण्यासाठी तुम्हाला 10 रुपये आणि त्यावर जीएसटी भरावा लागणारआहे.