Savings scheme : महिलांना बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना चालवली जाते. या योजनेत महिलांना जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
हे लक्षात घ्या की ही एक डिपॉझिट योजना असून ज्यात 7.5 टक्के दरानं व्याज मिळते. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला या योजनेचे नियम आणि अटी माहिती असाव्यात. लाखो महिला या योजनेत गुंतवणूक करत आहेत.
7.5 टक्के व्याजासह मिळेल कर सवलत
हे लक्षात घ्या की केंद्र सरकारने खास महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे. जास्त लाभामुळे ही पोस्ट ऑफिस ची सर्वात लोकप्रिय योजना बनली आहे. विशेष म्हणजे या योजनेत कोणत्याही मुली किंवा महिलेसाठी गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा रु. 2 लाख आहे. इतकेच नाही तर 10 वर्षांखालील मुलींनाही या योजनेचा लाभ घेता येईल. सरकराची ही योजना देखील करमुक्त आहे. तुम्हाला या सरकारी योजनेत 100 रुपये किंवा अगदी 1000 रुपयांपासून पैसे गुंतवता येतील.
गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवण्यापूर्वी महिला सन्मान योजनेतून मिळणाऱ्या व्याजाचा फायदा समजून घेण्यासाठी त्याची गणना समजून घेणे आवश्यक आहे. समजा जर एखाद्या महिलेने या योजनेत दोन वर्षांत 2 लाख रुपये गुंतवले तर त्या महिलेला 7.5 टक्के व्याज मिळेल.
म्हणजेच 2 लाख रुपयांवर तुम्हाला पहिल्या वर्षी 15 हजार रुपयांचा नफा मिळेल. तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला 2 लाख 15 हजार रुपयांवर 16 हजार 125 रुपयांचा फायदा मिळेल. अशा वेळी जर तुम्ही दोन वर्षात 2 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला एकूण 31 हजार 125 रुपये मिळू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागणार आहे.