Savings Account : प्रत्येक बँक आपल्या गुंतवणूकदारांसाठी चांगल्या सुविधा देत असते. काही बँका बचत खात्यावर सर्वात जास्त व्याज देत आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा होत आहे.
तुम्हाला आता RBL बँक बचत खात्यात ठेवलेल्या पैशांवर अधिक व्याज मिळेल. तुमचे खाते या बँकेत उघडले असेल तर आता तुम्हाला रोजच्या शिल्लक रकमेवर ४.२५ टक्के ते ७.७५ टक्के व्याज मिळू शकेल. हे व्याजदर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या ग्राहकांना लागू आहेत, हे लक्षात घ्या. या बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन व्याजदर २४ मे पासून लागू करण्यात आले आहेत.
RBL बँकेत 1 लाख रुपयांपर्यंतच्या दैनंदिन शिल्लकवर 4.25 टक्के व्याज मिळेल. 1 लाख ते 10 लाख रुपयांच्या ठेवींवर 5.50 टक्के, 10 लाख ते 25 लाख रुपयांच्या ठेवींवर 6 टक्के आणि 25 लाख ते 2 कोटी रुपयांच्या ठेवींवर 7.50 टक्के व्याज देण्यात येईल.
2 कोटी ते 3 कोटी रुपयांच्या रकमेवर 7 टक्के, 3 कोटी ते 7.5 कोटी रुपयांच्या रकमेवर 6.50 टक्के तसेच 7.5 कोटी ते 50 कोटी रुपयांच्या रकमेवर 6.25 टक्के, 50 कोटी रुपये. 75 कोटी ते 75 कोटी रुपयांच्या रकमेवर 5.25 टक्के व्याज देण्यात येईल.
असे मिळेल सर्वाधिक व्याज
75 कोटी ते 125 कोटी रुपयांच्या रकमेवर सर्वात जास्त 7.75 टक्के व्याज मिळेल. यानंतर 125 कोटी ते 200 कोटी रुपयांच्या रकमेवर 6 टक्के व्याज, 200 कोटी ते 400 कोटी रुपयांच्या रकमेवर 4 टक्के व्याज आणि 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 6.75 टक्के व्याज मिळेल.
RBL बँकेच्या देशभरातील शाखा
हे लक्षात घ्या की RBL बँक ही देशातील खाजगी क्षेत्रातील मोठी बँक असून 31 मार्च 2024 पर्यंत, बँकेच्या देशभरात एकूण 545 शाखा आहेत.