Savings Account । जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अनेकांना बचत खात्यात किती किमान शिल्लक ठेवावी? याची माहिती नसते. जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
एखाद्या व्यक्तीने आपल्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही तर त्याला दंड भरावा लागतो. सर्व बँकांची किमान शिल्लक मर्यादा वेगळी असून अनेकदा प्रश्न पडतो की खातेधारकांचे शून्य शिल्लक खाते असेल तर त्यांना किमान शिल्लक राखणे गरजेचे आहे का?
शून्य शिल्लक खाते
तुम्ही अनेक बँकांमध्ये शून्य शिल्लक खाते चालू करू शकता. यात ग्राहकाला किमान शिल्लक राखण्याची गरज नसून बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर एखाद्या व्यक्तीने शून्य शिल्लक खाते चालू केले असेल तर त्याला किमान शिल्लक राखण्याची गरज नाही. अशा वेळी बँकधारक मोफत व्यवहार करू शकतात. झिरो बॅलन्समध्ये कोणताही व्यवहार होत नाही.
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना 10,000 रुपये आणि निमशहरी ग्राहकांना 2,000 रुपये आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना 1,000 रुपये शिल्लक ठेवावे लागतात.
ICICI बँक
ICICI बँकेतील बचत खात्यातही किमान शिल्लक ठेवावी. ग्राहकाने त्याच्या खात्यात किमान 10,000 रुपये ठेवणे गरजेचे आहे. निमशहरी शाखांमधील खातेदारांना किमान 5,000 रुपये शिल्लक ठेवावी.
कॅनरा बँक
कॅनरा बँकेच्या ग्राहकाला दरमहा त्याच्या खात्यात किमान 2,000 रुपये ठेवावे लागतात आणि निमशहरी भागातील बँक खातेदारांना 1,000 रुपये आणि ग्रामीण भागातील खातेधारकांना 500 रुपये शिल्लक ठेवावे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
अलीकडेच SBI बँकेकडून बचत खात्यातील मासिक किमान शिल्लक रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यात 3,000, 2,000 किंवा 1,000 रुपये ठेवावे लागत होते.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकेच्या ग्राहकाला बचत खात्यात किमान शिल्लक राखावी. खात्यातील किमान शिल्लक निकष 10,000 रुपये असून निमशहरी शाखेत ही मर्यादा २५०० रुपये आहे.