Saving Account vs Current Account : सध्याच्या काळातील यूपीआय व्यवहार असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीला ऑनलाईन (Saving Account vs Current Account) पेमेंट करण्याचा प्रश्न असेल कुठल्याही गोष्टीसाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा व्यक्ती बँकेत खाते उघडतो तेव्हा तो बँकेत शक्यतो बचत खाते (Saving Account) किंवा चालू खाते यांचा (Current Account) पर्याय निवडतो. बरेच लोक बचत खाते उघडतात आणि व्यापारी लोक चालू खाते उघडतात. आज आम्ही तुम्हाला बचत खाते आणि चालू खाते यामध्ये काय फरक आहे आणि यापैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरू शकेल याबाबत माहिती देणार आहोत.
वास्तविक ही दोन्ही खाती व्यवहार करण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी वापरले जातात. परंतु या दोन्ही खात्यांमध्ये काही मूलभूत फरक आहेत हे फरक तुम्ही जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. दोन्ही खात्यात काय फरक आहे हे एकदा तुमच्या लक्षात आल्यानंतर तुमच्यासाठी कोणते खाते योग्य राहिल याची निवड तुम्ही सहज करू शकता.
Personal Loan : सावधान! बँकेकडून लोन घेत आहात? लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
Saving Account
सेविंग खात्याची वैशिष्ट्ये
सेविंग अकाउंट अशा लोकांसाठी आहे जे बचत म्हणून पैसे जमा करण्याचा विचार करतात म्हणून त्याला बचत खाते असेही म्हटले जाते. बचत खात्यात असलेल्या रकमेच्या आधारावर बँकेकडून व्याज दिले जाते. अनेक बँकांमध्ये ग्राहक शून्य शिल्लक असतानाही खाते उघडू शकतात. त्याचवेळी काही बँका ग्राहकांसाठी किमान मर्यादा शिल्लक ठेवण्यास सांगतात. बचत खात्यात किमान शिल्लक सोबत कमाल शिल्लक ठेवण्याची मर्यादा आहे. बचत खातेधारक दरमहा एका मर्यादेपर्यंत खात्यातून व्यवहार करू शकतात.
जर त्यांना मर्यादेपेक्षा जास्त पैशांची गरज असेल किंवा जास्त व्यवहार करायचे असतील तर त्यासाठी बँकेची परवानगी घ्यावी लागेल. जर एखाद्या बचत खातेधारकाला एका वर्षात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर त्याला व्याजावर कर भरावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही (Senior Citizen) मर्यादा 50 हजार रुपयापर्यंत आहे. बचत खातेधारकांना बँक लॉकरवर 15 ते 30 टक्के सूट मिळते. बचत खात्याद्वारे ग्राहक सहजपणे क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा विमा प्रीमियम देखील (Insurance Premium) भरू शकतात.
Credit Card Use : क्रेडिट स्कोअर कमी झाल्याने काळजीत आहात? ‘या’ 5 गोष्टींचा आधी विचार करा
Saving Account
करंट अकाउंटची वैशिष्ट्ये
करंट अकाउंट हे व्यवसायिक व्यवहारांसाठी वापरले जाते म्हणून त्याला चालू खाते असेही म्हटले जाते. या खात्यावर बँकेकडून कोणतेही व्याज दिले जात नाही. खात्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही. त्यामुळे खातेधारकाला चालू खात्यावर कोणताही कर भरावा लागत नाही. चालू खातेधारकाला खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. तथापि कमाल शिल्लक वर मर्यादा नाही.
हे खाते व्यावसायिक व्यवहारांसाठी उघडले जाते. यामुळे महिन्याभरात या खात्यातून कितीही व्यवहार करता येतात. चालू खातेधारक देशातील कोणत्याही बँकेत जाऊन रोख रक्कम काढू शकतात. चालू खातेधारकांनाही सहज कर्ज मिळते. बऱ्याच बँका चालू खातेधारकांना डोर स्टेप कर्ज सुविधा देखील देतात. चालू खातेधारक देखील ड्राफ्ट द्वारे सहज व्यवहार करू शकतात.