Saving Account Rules : प्रत्येक बँक बचत खात्यातील जमा केलेल्या पैशांवर वेगवेगळे व्याज आकारत असते. जास्त व्याज देणाऱ्या बँकेत पैसे गुंतवण्यावर ग्राहकांचा कल असतो. जर तुम्ही बचत खात्यात पैसे जमा करत असाल तर त्यापूर्वी इन्कम टॅक्सचे नियम जाणून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.
बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी बँकांनी एक मर्यादा निश्चित केली असून या बँकांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच तुम्ही तुमच्या बचत खात्यात रोख रक्कम जमा करू शकता.
बचत खात्याची मर्यादा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, तुमचे कोणत्याही बँकेत बचत खाते असेल तर तुम्ही एका आर्थिक वर्षात तुमच्या बचत खात्यात जास्तीत जास्त 10 लाख रुपये रोख जमा करता येईल. तुम्ही तुमच्या बचत खात्यात एका आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली तर बँकांना याबाबतची संपूर्ण माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे.
यापूर्वी, बँक ग्राहक त्यांच्या बचत खात्यात एकाच वेळी 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रोख जमा करू शकत होते, पण आता ते 2.5 लाख रुपये केले आहे. ही ठेव करण्यासाठी, तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक प्रदान करणे बंधनकारक आहे.
भरावा लागणार 60% कर
बँकिंग क्षेत्रातील ग्राहकांनी त्यांच्या बचत खात्यात एका आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास आयकर विभाग तुमच्याकडून या रकमेच्या 60% कर वसूल करेल. समजा तुम्ही एका आर्थिक वर्षात बचत खात्यात 10 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास तुम्हाला आयकर रिटर्न विभागाकडे रोख जमा केलेल्या रकमेचे समाधानकारक उत्तर द्यावे लागणार आहे. समजा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न विभागाला उत्पन्नाचा स्रोत सांगू शकत नसल्यास आयकर रिटर्न विभाग जमा केलेल्या रकमेवर 60% कर, 25% अधिभार आणि 4% उपकर लावू शकते.
आपल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग क्षेत्रातील ग्राहकांना त्यांच्या बचत खाते, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, चेक शुल्क इत्यादींमध्ये रोख रक्कम जमा करण्याच्या कमाल मर्यादेबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने लोकांना जागरुक करताना सांगण्यात आले आहे, जर एखाद्या व्यक्तीने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही तर आयकर विवरण विभाग त्याच्यावर दंड आकारेल.