Smartphone offer : अप्रतिम ऑफर! iPhone 13 सह ‘या’ फोनवर होईल हजारोंची बचत, पहा संपूर्ण ऑफर

Smartphone offer : तुम्ही आता आयफोन 13,Samsung Galaxy M15 5G तसेच OnePlus Nord 3 5G खूप मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. यामुळे तुम्ही हजारोंची बचत करू शकाल.

आयफोन 13 ऑफर

किमतीचा विचार केला तर iPhone 13 चा ब्लू कलर व्हेरिएंट 48,799 रुपयांना सेलमधून खरेदी करता येत आहे. तर एअरटेल पोस्टपेडवर स्विच करणाऱ्या युजर्सना 1200 रुपयांची शानदार सवलत मिळेल. तसेच कंपनी या फोनवर 2440 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत असून एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 44,250 रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. फोनमध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देत असून सेल्फी कॅमेरा 12 मेगापिक्सल्सचा आहे. हा iPhone A15 Bionic चिपसेटवर काम करेल.

Samsung Galaxy M15 5G ऑफर

किमतीचा विचार केला तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. तुम्हाला तो 1,000 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह सेलमध्ये खरेदी करता येईल. बँक डिस्काउंटसह फोन 11,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

तर या फोनवर 650 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही देण्यात येत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 12 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. या सॅमसंग फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले पाहायला मिळेल. तर या फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे.

OnePlus Nord 3 5G ऑफर

8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज फोनची किंमत 19,998 रुपये आहे. बँक ऑफर्समध्ये फोन 1500 रुपयांपर्यंत स्वस्त होईल. सेलमध्ये या फोनवर 999 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. तुम्ही हा OnePlus फोन आकर्षक EMI वर खरेदी करता येईल.

हा फोन तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये 17,650 रुपयांपर्यंत स्वस्त किंमतीत मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा डिस्प्ले पाहायला मिळेल. तर फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असून हा फोन 5000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग देते.

Leave a Comment