IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SA) टीम इंडियाला (Team India) 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला असला तरी या सामन्यात संजू सॅमसनने (Sanju Samson) आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. या सामन्यात त्याने 63 चेंडूत 86 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले.
याआधी पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात 10-10 ओव्हर कमी कराव्या लागल्या. ज्यामध्ये भारताचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने (South Africa) हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलरच्या (David Miller) शानदार अर्धशतकांच्या जोरावर 4 गडी गमावून 249 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ 8 गडी गमावून 240 धावाच करू शकला.
टीम इंडियासाठी संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 86 रन केले. सामना संपल्यानंतर संजू सॅमसनने कुठे कमी पडले हे सांगितले. तो म्हणाला की, “मला विकेटवर थोडा वेळ घ्यायला आवडते. सामना जिंकण्यासाठी खेळतोय पण थोडे बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 30 धावा करायच्या होत्या, पण संजू 1 षटकार आणि 3 चौकार मारून केवळ 21 धावा करू शकला आणि टीम इंडियाला 9 धावांनी सामना गमवावा लागला. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते. मी 4 षटकार मारू शकलो असतो, असेही सॅमसन म्हणाला. मालिकेतील दुसरा सामना ९ ऑक्टोबरला रांची येथे होणार आहे.
याआधी झालेल्या टी 20 सामन्यांची मालिका भारताने जिंकली आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकले तर आफ्रिकेच्या संघाने एक सामना जिंकला. त्यानंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मात्र भारतीय संघाची सुरुवातच पराभवाने झाली आहे. संघाला पुन्हा विजयी मार्गावर येण्यासाठी 9 ऑक्टोबर रोजी होणारा सामना जिंकणे महत्वाचे राहणार आहे.