Sanju Samson : संजू सॅमसन (Sanju Samson) नशीब काही लवकर त्याला साथ देत नाही असेच दिसत आहे. कारण, याआधीही त्याची निवड भारतीय संघात होऊ शकलेली नाही. आशिया चषक (Asia Cup 2023) ते Asian Games आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका (IND vs AUS). विश्वचषकापूर्वी संजू सॅमसनला मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयने (BCCI) सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दोन प्रकारचे संघ जाहीर केले, त्यापैकी एकाही संघाचे लक्ष संजू सॅमसनकडे गेले नाही. या दुर्लक्षानंतर संजूला 2027 चा विजेता कर्णधार म्हटले जात आहे.
संजू सॅमसनने टीम इंडियासाठी (Team India) 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 55.71 च्या सरासरीने 390 धावा केल्या आहेत. अलीकडेच, या स्टार फलंदाजाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन संधी देण्यात आल्या, त्यापैकी एका सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावले. असे असूनही तो आशिया कप चॅम्पियन संघाचा भाग नव्हता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून सॅमसनला वगळल्यानंतर चाहत्यांच्या संतापाला पुन्हा एकदा उधाण आले आहे. दुर्लक्ष सहन केल्यानंतर संजू सॅमसनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने लिहिले की, “जसे आहे तसे आहे. मी मात्र नेहमीच पुढे जाण्याचा मार्ग निवडतो.”
आशियाई क्रीडा स्पर्धेतही संधी नाही
संजू सॅमसनला केवळ आशिया चषकच नव्हे तर आशियाई क्रीडा स्पर्धेतही (Asian Games) प्राधान्य दिले गेले नाही. जर संजू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या संघात नसेल तर तो विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण बीसीसीआयने त्याची विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. एकदिवसीय सामन्यात सॅमसनची सूर्यकुमार यादवशी (Suruakumar Yadav) तुलना केली तर संजू शर्यतीत पुढे असल्याचे दिसते, परंतु यावर्षी नशिबाने त्याला सातत्याने फटका धोका दिला आहे. संजू सॅमसनच्या पोस्टवरील कमेंटमध्ये एका चाहत्याने त्याला 2027 विश्वचषक विजेता कर्णधार म्हटले आहे.
भारतीय संघ वर्षात दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पहिल्यांदाच टीम इंडियाने मार्चमध्ये कांगारूंविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली होती, ज्यामध्ये संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या काळातही संजू सॅमसनकडे दुर्लक्ष झाले. त्यादरम्यान, त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली होती.