Sanjay Shirsat । धक्कादायक! संजय शिरसाट यांच्या गाडीवर हल्ला, कुटुंबीय कारमध्ये….

Sanjay Shirsat । राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालणे हे पोलीस प्रशासनासमोरचे एक मोठं आव्हान बनले आहे. अनेकदा राजकीय नेत्यांवर देखील हल्ले होतात. सध्या अशीच एक हल्ल्याची घटना घडली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संजय शिरसाट कुटुंबीय सोबत असतांना गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार घडला आहे. उपलब्ध माहितीनुसार, संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौकात रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी दगड मारला तेव्हा शिरसाट यांच्या पत्नी, कन्या आणि मुलगा गाडीतच होता. रस्त्यावर भांडण सुरू असल्याने शिरसाट कुटुंबीयांनी गाडी थांबवली होती. शिरसाट यांच्यागाडीवर दगड फेकल्याच्या घटनेनंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. इतकेच नाही तर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील जमा झाले होते.

अजूनही शिरसाट यांच्या गाडीवर कोणी दगड मारला हे समजू शकले नाही. रस्त्यावर झालेल्या भांडणादरम्यान शिरसाट यांच्या गाडीवर दगड फेकला की, त्यांना लक्ष्य करण्यासाठी दगड मारण्यात आला? याचा तपास सुरु आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणी संजय शिरसाट यांनी कोणती प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment