Sanjay Raut: अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भुमिका आहे. असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, महायुती मधील अजित पवार यांना बाहेर काढण्याची प्रयत्न सुरू आहे आणि ही भूमिका शिंदे गटाची आहे. जर अजित पवार महायुतीमध्ये राहिले तर शिंदे गटाला जागा कमी येणार. तीन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही. महायुती हा शब्द गोंडस आहे ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्यात मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहे असं संजय राऊत म्हणाले.
नवाब मलिक यांच्यावर कार्यवाही सुडाने : संजय राऊत
विधानसभेची मुदत संपत आलेली आहे. पण नवाब मलिक यांच्यावर कार्यवाही ही सुडाने झाली होती. नवाब मलिक हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर सातत्याने पुराव्यांसह बोलत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर ईडीची कारवाई करायला भाग पाडलं. असाही आरोप संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.
आज नवाब मलिक सरकारमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांना माझा एक प्रश्न आहे जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक नितीमत्तेचा पुळका येऊन एक पत्र लिहिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्याव किंवा त्यांनी जाहीर करावं की नवाब मलिक यांच्यावरील सर्व खटले खोटे आहेत.
सर फडणवीस हे खोटं बोलतात. ते खोटारडे नंबर एक आहेत. देवेंद्र फडणवीस यांना ते पत्र मिळत नसेल, तर मी त्यांना ते पत्र पाठवीन ते ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे. ते राष्ट्रभक्तीचा ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे. असेही राऊत म्हणाले.