Sanjay Raut । संजय राऊतांच्या निर्णयामुळे मविआत वादाची ठिणगी, आघाडी तुटणार?

Sanjay Raut । राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत असल्याचे पहायला मिळते. नुकतेच अहमदनगर येथील खासदार संजय राऊत यांच्या हस्ते श्रीगोंदा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी एक घोषणा केली.

त्यामुळे मविआत वादाची ठिणगी पडली आहे. आगामी विधानसभा निवडणूक श्रीगोंदा आणि अहमदनगर शहरची ठाकरे गट जागा लढवणार आहे, असे संजय राऊत यांनी जाहीर केले. असे असले तरी महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू झाली नाही. अशातच संजय राऊतांनी दोन जागांवर दावा ठोकला आहे, त्यामुळे मविआमध्ये वाद निर्माण होऊ शकतात.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पुन्हा एकदा जागा वाटपावरुन वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विधानसभेपर्यंत या आघाड्या कायम राहणार की नाही? जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल? हे पाहणे महत्त्वाचे असेल.

दरम्यान, उद्घाटनादरम्यान त्या ठिकाणी आलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नगर शहर विधानसभा मतदार संघ आपलाच असिन त्यासाठी कामाला लागा उमेदवार नंतर ठरवू असा आवडेश संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता सांगलीप्रमाणे पुन्हा एकदा मविआमध्ये वादाची ठिणगी पडणार का? हे येत्या काळात समजेल.

Leave a Comment