मुंबई : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटीनंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही गमावली आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला. तिसरा सामना अजून बाकी आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये आर. अश्विन आणि चहल यांनी संघास सावरले पण, फारसा फायदा झाला नाही. वेगवान गोलंदाजांनीही निराशा केली. त्यानंतर आता भारतीय संघाच्या कामगिरीवर माजी खेळाडू प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याने फिरकी गोलंदाज आर. अश्विनवर जोरदार टीका केली आहे.
आर. अश्विनला एकदिवसीय संघात घेण्यात काहीच अर्थ नाही, असे मांजरेकर म्हणाले. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की मी मालिकेच्या सुरुवातीपासूनच म्हणत होतो की तो विनाकारण एकदिवसीय संघात परत आला आहे. आता भारतीय संघास हे समजले आहे की तो प्रभावी फिरकी गोलंदाज नाही ज्याची संघाला खरी गरज आहे.” अश्विनने दोन सामन्यांत फक्त एक विकेट घेतली.
भारतीय संघास त्या काळात परत जाण्याची गरज आहे जेव्हा ते मधल्या ओव्हरमध्ये नियमित अंतराने विकेट घेत होते. 2023 च्या विश्वकप स्पर्धेत कुलदीप यादवला आणखी एक संधी देण्याची योग्य वेळ आता आली आहे, असे मांजरेकर यांनी सांगितले.
दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही आफ्रिकेने पराभव केला. दोन्ही मालिकांमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना आता रविवारी केपटाऊनमध्ये होणार आहे. भारतीय संघास दुसरा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे होते. मात्र, या सामन्यातही खेळाडूंनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. मालिकाही गमावली. आता तिसरा सामना फक्त औपचारिकता म्हणून राहिला आहे. हा सामना जिंकला किंवा हरला तरीही दक्षिण आफ्रिकेला काहीच फरक पडणार नाही. कारण त्यांनी दोन सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे.
IND vs SA : .. म्हणून टीम इंडियाने सामना आणि मालिकाही गमावली; ‘ही’ आहेत पराभवाची 5 मोठी कारणे