Sangli Lok Sabha | सांगलीत ‘मविआ’ला धक्का! ‘त्यांची’ बंडखोरी कायम; तिरंगी लढत अखेर ठरलीच..

Sangli Lok Sabha Vishal Patil : सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली (Sangli Lok Sabha Vishal Patil) धुसफूस अजूनही कायम आहे. आता तर या मतदारसंघात तिहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली मतदारसंघात काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या होत्या. विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भरपूर प्रयत्न केले. परंतु विशाल पाटील यांनी आपला निर्णय बदलला नाही. दरम्यान आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी नेते मंडळींकडून जोरदार प्रयत्न केले जात होते. परंतु त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे आता या मतदारसंघात तिहेरी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

या मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीने विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला सोडावी यासाठी काँग्रेस नेते इच्छुक होते. परंतु तसं घडलं नाही. ठाकरे गटाने जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज होत विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे विशाल पाटील काय निर्णय घेणार याची उत्सुकता होती. मात्र विशाल पाटील यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे.

Sangli Lok Sabha Election | सांगलीत भाजपला धक्का! ‘या’ माजी आमदाराचा राजीनामा; विशाल पाटलांना पाठिंबा

Sangli Lok Sabha

विशाल पाटील यांनी बंडखोरीचा इशारा दिल्यापासून काँग्रेस नेत्यांकडून त्यांचे मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. मात्र विशाल पाटील यांचे नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आले. त्यामुळे आता सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील महायुतीचे संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील अशा तिघांत लढत निश्चित झाली आहे.

विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता त्यांना कोणते निवडणूक चिन्ह मिळणार याची उत्सुकता आहे. विशाल पाटील यांनी बंडखोरी करताच सोशल मीडियावर बंडखोरी सांगलीची परंपरा अशा आशयाचे मेसेज फिरायला सुरुवात झाली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप सुरू आहे. यामध्ये विशाल पाटील यांना कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशाल पाटील यांनी अर्ज भरताना शेट्टी, टेबल आणि गॅस सिलिंडर यापैकी एक चिन्ह मिळावे अशी मागणी केली आहे.

Sangli Lok Sabha

Sangli Lok Sabha | काँग्रेसचा माइंडगेम! सांगलीसाठी ठाकरेंना नवा प्रस्ताव; पॉलिटिकल खेळीत कुणाचा पत्ता कट?

Leave a Comment