Sangli Lok Sabha : ‘सांगली’वरुन ठिणगी! जागा सोडण्यास ठाकरेंचा नकार; काँग्रेस नेत्यांनी गाठली दिल्ली

Sangli Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीत सांगली मतदारसंघावरून चांगलाच (Sangli Lok Sabha Constituency) तिला निर्माण झाला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे काँग्रेसचे नेते प्रचंड (Congress Party) संतापले आहेत. काँग्रेस या मतदारसंघात बळकट स्थितीत आहे असे असतानाही ठाकरे गटाने कोणताही विचार न करता उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नेते अस्वस्थ झाले आहेत. या अस्वस्थतेतूनच आता वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. उमेदवार बदलण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

काँग्रेस नेत्यांकडून सांगलीच्या जागेसाठी आग्रह धरला जात आहे. परंतु सांगलीची जागा सोडण्यास ठाकरे गटाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. काल पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सांगलीची जागा शिवसेनेने लढवायचं ठरवलं असून आता काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. यानंतर आज संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगलीची जागा शिवसेना लढणार असे ठाम शब्दात संजय राऊत यांनी सांगितले होते.

Osmanabad Lok Sabha : धाराशिवचा उमेदवार ठरला! भाजप आमदाराच्या पत्नीला राष्ट्रवादीनं दिलं तिकीट..

Sangli Lok Sabha

यानंतर महाविकास आघाडी अस्वस्थता चांगलीच वाढली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर आमदार विश्वजीत कदम यांनी काही निवडक काँग्रेस नेत्यांसह दिल्ली गाठली आहे. सांगलीच्या जागेबाबत समाधानकारक तोडगा जर निघाला नाही तर या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडच्या नेत्यांसमोर मांडण्यात येणार आहे. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आज दुपारी खाजगी विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

विश्वजीत कदम यांच्याबरोबर काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील देखील (Vishal Patil) आहेत या दोघांकडून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतली जाणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगलीच्या जागेबाबत निर्णय घेतला जाईल. आता या घडामोडीत आगामी काही दिवसात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Parbhani Lok Sabha : परभणीत मोठ्ठा ट्विस्ट! वंचितने उमेदवार बदलला; हवामान अभ्यासकच मैदानात

Leave a Comment