Sangali Accident : राज्यात सध्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या अपघातामध्ये अनेक जण जखमी होत आहे तर काहींचा मुत्यू देखील होत आहे.
यातच आता पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीमध्ये एका लग्नावरून परतणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये 5 वऱ्हाडींचा जागीच मुत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, क्रुझर जीप आणि लक्झरीचा नागज-जत रोडवर जांभूळवाडीमध्ये हा भीषण अपघात झाला. क्रुझर जीपमधू लग्नाचे वऱ्हाडी प्रवास करत होते, ही जीप विजयपूर-गुहागर महामार्गावर असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मुंबईकडील जाणाऱ्या लक्झरी बसला धडक दिली. जीपमध्ये बसलेले 5 जण जागीच ठार झाले तर इतर लोक जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातात क्रुझर जीपच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलीसांनी गंभीर जखमींना ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तर काहींना पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले.
काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.