Samsung Smartphone Offer : त्वरा करा! 12 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा Samsung चे सर्वाधिक विकले जाणारे 5G फोन

Samsung Smartphone Offer : तुम्हाला स्वस्तात फोन खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टचा सुपर व्हॅल्यू डेज सेल खास तुमच्यासाठी आहे. या सेलमधून तुम्ही Samsung Galaxy M आणि F सीरीज 5G फोन मूळ किमतीपेक्षा स्वस्त खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M14 5G ऑफर

किमतीचा विचार केला तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनच्या स्मोकी टील कलर व्हेरिएंटची किंमत 11,375 रुपये इतकी आहे. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC बँकेच्या कार्डद्वारे पैसे भरले तर तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय कंपनी Flipkart Axis Bank कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या युजर्सना 5% कॅशबॅक देत आहे.

इतकेच नाही तर तुम्ही हा फोन 400 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास हा सॅमसंग फोन 6.6 इंच डिस्प्ले सह येतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 6000mAh आहे.

Samsung Galaxy F14 5G ऑफर

किमतीचा विचार केला तर सॅमसंगचा हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 11,990 रुपयांना उपलब्ध असून तुम्ही हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह 5 टक्के कॅशबॅकसह खरेदी करू शकता. या कॅशबॅकसाठी तुम्हाला फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट करावे लागणार आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये फोनची किंमत 11,400 रुपयांपर्यंत असू शकते.

तुम्हाला या सॅमसंग फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले पाहायला मिळेल. तर प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Exynos 1330 चिपसेट देत आहे. या फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh बॅटरी पाहायला मिळेल.

Leave a Comment