Samsung Galaxy S24 Ultra : धमाकेदार ऑफर! 80 हजारांच्या सवलतीत खरेदी करा Galaxy S24 Ultra, पहा ऑफर

Samsung Galaxy S24 Ultra : सॅमसंगचे अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. ज्याची किंमत वेगवेगळी आहे. काही मॉडेलच्या किमती खूप जास्त आहेत. अनेकांना हे फोन महाग असल्याने खरेदी करता येत नाही. तुम्ही आता Galaxy S24 Ultra 80 हजारांच्या स्वस्त किमतीत खरेदी करू शकता.

हे लक्षात घ्या की सॅमसंगच्या Galaxy S24 Ultra वर बंपर डिस्काउंटचा फायदा अनेक ऑफर्स एकत्र करून देण्यात येत आहे. AI फीचर्स सपोर्ट असणाऱ्या या डिव्हाइसवर 60 हजार रुपयांपेक्षा जास्त एक्स्चेंज डिस्काउंट मिळेल. ज्याची किंमत जुन्या मॉडेलच्या स्थितीवर अवलंबून असते. यावर बंपर अपग्रेड बोनसचा लाभही मर्यादित काळासाठी दिला जात असून यावर एकूण 80,000 रुपयांची सवलत देण्यात येत आहे.

मिळेल या ऑफर्सचा लाभ

सॅमसंग गॅलेक्सी S23 चे 256GB स्टोरेज असणाऱ्या बेस मॉडेलची भारतात किंमत 1,29,999 रुपये इतकी आहे. कंपनीनुसार, Galaxy Ultra Days सेलमध्ये जुन्या फोनवर 63,000 रुपयांचे एक्सचेंज व्हॅल्यू देण्यात येत आहे, 12,000 रुपयांचा अपग्रेड बोनसही मिळेल.

ग्राहकांनी त्यांचे जुने Galaxy S-सिरीज डिव्हाइस एक्सचेंज केला तर त्यांना 5,000 रुपयांचा विशेष अपग्रेड बोनस मिळेल. कंपनीचा असा दावा आहे की या अनेक ऑफर्ससह, गॅलेक्सी अल्ट्रा डेज सेलमध्ये ऑफरची किंमत 49,999 रुपये असू शकते.

तुम्हाला अपग्रेड ऑफरऐवजी बँक ऑफरचा लाभ हवा असेल तर HDFC बँकेकडून पैसे भरले तर तुम्हाला 6,000 रुपयांची त्वरित सवलत मिळेल. या फोनसोबत Galaxy Watch6 खरेदीवर तुम्हाला 12,000 रुपयांची सवलत मिळेल.

जाणून घ्या फीचर्स

Samsung स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा डायनॅमिक LTPO AMOLED 2x डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह 2600nits पर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला आहे.

Android 14 वर आधारित OneUI 6.1 उपलब्ध असून फोनच्या मागील पॅनलवर 200MP+10MP+50MP+12MP क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या समोर 12MP सेल्फी कॅमेरा आहे. 5000mAh बॅटरी 45W वायर्ड, 15W वायरलेस आणि 4.5W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्टसह प्रदान केली आहे.

Leave a Comment