Samsung Galaxy S24 : काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला Samsung Galaxy S24 हा फोन लाँच केला होता. तो तुम्हाला आता खूपच स्वस्तात खरेदी करता येईल. कंपनी यावर शानदार ऑफर देत आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
जाणून घ्या किंमत आणि ऑफर
किमतीचा विचार केला तर Samsung Galaxy S24 च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची भारतात किंमत 74,999 रुपये इतकी आहे. तुम्ही तो Samsung eStore वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीच्या या फोनवर तुम्हाला 5,000 रुपयांची सवलत देत आहे.
ज्याचा लाभ HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट (केवळ EMI) कार्ड व्यवहार वापरून घेता येतो. या फोनवर 10,000 रुपयांपर्यंतचा झटपट एक्सचेंज बोनस मिळेल. पण तो बँकेच्या ऑफरसह एकत्र केला जाऊ शकत नाही. याचा अर्थ दोनपैकी एक ऑफर घेता येईल.
हा फोन तुम्हाला कोबाल्ट व्हायोलेट, एम्बर यलो, ओनिक्स ब्लॅक आणि मार्बल ग्रे या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Samsung Galaxy S24 च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 74,999 रुपये इतकी तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 79,999 रुपये आणि 8GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये इतकी आहे.
जाणून घ्या फीचर्स
Samsung Galaxy S24 हा Galaxy S24 लाइनअपमधील हा फोन आहे. या जबरदस्त फोनमध्ये 1-120Hz रिफ्रेश रेट, फुल एचडी+ रिझोल्यूशन, 2600 निट्स पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षणासह 6.2-इंचाचा डायनॅमिक AMOLED डिस्प्ले दिला आहे.
हा फोन Samsung च्या Exynos 2400 चिपसेट आणि Xclipse 940 GPU ने सुसज्ज असून हा फोन प्रकारांमध्ये 128GB/256GB/512GB आणि तिन्ही प्रकारांमध्ये 8GB रॅम आहे. हा फोन OneUI 6.1 वर काम करतो, जो Android 14 वर आधारित असून त्याला 7 वर्षांसाठी OS सपोर्ट मिळेल.
या फोनमध्ये OIS सह 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि OIS आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10-मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 12-मेगापिक्सेल लेन्स असून या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000 mAh बॅटरी आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्टिरिओ स्पीकर दिले आहे. फोनमध्ये AI वैशिष्ट्ये उपलब्ध असून तो IP68 वॉटर रेसिस्टंट रेटिंगसह येतो.