Samsung Galaxy S24 AI : 80 हजारांचा फोन 25 हजारांपेक्षा स्वस्तात येईल खरेदी करता, कुठे मिळत आहे ऑफर? पहा

Samsung Galaxy S24 AI : सध्या amazon ची जबरदस्त सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्ही कोणत्याही वस्तू मोठया सवलतीत खरेदी करू शकता. यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. तुम्ही आता Samsung Galaxy S24 AI फोन मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता.

तुम्हाला तुमच्या जुन्या फोनचे संपूर्ण एक्सचेंज मिळाले तर हा फोन रु 79,998 – 56,250 म्हणजेच 23,748 रु. एक्स्चेंज ऑफरमध्ये खरेदी करता येईल. पण हा फोन विकत घेण्यापूर्वी, तुम्हाला हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की एक्सचेंज बोनस तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असणार आहे.

तुमच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला हा फोन 4,250 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. या सेलमध्ये हा फोन आकर्षक EMI वर देखील खरेदी करता येईल. सेल 7 मे पर्यंत चालेल.

Samsung Galaxy S24 AI चे फीचर्स

कंपनी Samsung Galaxy S24 AI फोनमध्ये 6.20 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देत असून डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये गोरिल्ला ग्लास देत असून फोन 8 GB रॅम आणि 512 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येईल.

तर फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे. यात 12-मेगापिक्सेल आणि 50-मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह 10-मेगापिक्सेल कॅमेरा असेल तसेच सेल्फीसाठी यात 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या सॅमसंग फोनमध्ये तुम्हाला 4000mAh बॅटरी मिळत असून ही बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनच्या OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 14 वर आधारित OneUI 6.1 वर काम करेल. तर फोन IP68 डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शनसह येतो.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, Bluetooth 5.3 आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय आहेत. फोन Amber Yellow, Cobalt Violet, Marble Grey आणि Onyx Black कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

Leave a Comment