Samsung Galaxy S23 Ultra: जर तुम्ही स्टायलिश लूक आणि भन्नाट फीचर्ससह येणारा नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात Samsung Galaxy S23 Ultra बंपर डिस्काउंटसह विकला जात आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत हजारो रुपयांची बचत करून हा फोन घरी आणू शकतात.
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये तब्बल 200 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. चला मग जाणुन घ्या संपूर्ण ऑफरबद्दल सविस्तर माहिती.
Samsung Galaxy S23 Ultra स्पेसिफिकेशन्स
या मोबाईलमध्ये तुम्हाला 120hz रिफ्रेश रेट सपोर्टसह वक्र 6.8-इंच 2X डायनॅमिक AMOLED डिस्प्ले मिळत आहे. सुरक्षिततेसाठी, यात अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. त्याचबरोबर डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चे संरक्षण देण्यात आले आहे. याशिवाय यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेटही देण्यात आला आहे.
हा हँडसेट तीन व्हेरीयंटमध्ये उपलब्ध असेल (8 GB RAM + 256 GB स्टोरेज, 12 GB RAM + 512 GB स्टोरेज आणि 12 GB RAM + 1 TB स्टोरेज). बॅटरी बॅकअपसाठी, यात 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मजबूत 5000mAh बॅटरी देखील मिळेल.
Samsung Galaxy S23 Ultra कॅमेरा
फोटोग्राफीसाठी यामध्ये क्वाड कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. ज्यामध्ये 200MP मेन कॅमेरा, 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स, 10-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आणि 10-मेगापिक्सेल पेरिस्कोप झूम कॅमेरा देखील समाविष्ट असेल. तसेच हा फोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
Samsung Galaxy S23 Ultra किंमत आणि ऑफर्स
किंमत आणि ऑफर्सबद्दल बोलायचे तर त्याच्या 256 GB स्टोरेज व्हेरीयंटची किंमत 1,24,990 रुपये आहे. जे तुम्ही Amazon वेबसाइटवरून खरेदी करू शकता. त्याच वेळी, बँक ऑफर अंतर्गत तुम्हाला HDFC बँक कार्डवरून 3,000 रुपयांची सूट मिळत आहे.
याशिवाय तुम्हाला 65,940 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. जेव्हा तुमच्या जुन्या हँडसेटची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल देखील नवीनतम असेल तेव्हाच तुम्हाला ही सूट मिळेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 59,880 रुपयांची सूट उपलब्ध आहे.