Samsung Galaxy S23 : सोडू नका अशी धमाकेदार संधी! 40 हजारांनी स्वस्तात मिळतोय सर्वाधिक मागणी असणारा फोन

Samsung Galaxy S23 : ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने एक शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे तुम्हाला 40 हजारांनी स्वस्तात Samsung Galaxy S23 फोन खरेदी करता येईल. जाणून घेऊयात सविस्तर ऑफर.

सेल दरम्यान, हा स्मार्टफोन 40,000 रुपयांपर्यंत आणि 44 टक्क्यांपर्यंत सूट देऊन खरेदी करू शकता. तसेच खरेदीदार उपलब्ध ऑफरद्वारे अतिरिक्त सवलत मिळवू शकतात. तुम्ही प्रीमियम फोन 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर तुम्ही चुकूनही ही ऑफर चुकवू नका.

Samsung Galaxy S23 5G ची किंमत

किमतीचा विचार केला तर हा स्मार्टफोन Flipkart वर 49,999 रुपये (8GB + 128GB) मध्ये उपलब्ध असून या फोनच्या 8GB + 256GB वेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे. ही खास ऑफर Samsung.com वर देखील उपलब्ध आहे. फोन तुम्ही क्रीम, ग्रीन, लॅव्हेंडर आणि फँटम ब्लॅक शेड्समध्ये खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S23 5G ऑफर

तर फ्लिपकार्टवर, तुम्ही कॉम्बो ऑफरद्वारे फोनवर 3,000 रुपयांची सूट देखील घेऊ शकता. एक्सचेंजचा संबंध आहे, खरेदीदारांना एक्सचेंज ऑफरद्वारे 41,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. जाणून घेऊया फोनचे काही खास फिचर्स.

Samsung Galaxy S23 5G चे फीचर्स

या शानदार फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.1-इंचाचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले मिळेल. फोन Adreno 740 GPU सह Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह सुसज्ज असून तो नवीनतम OneUI 6.1 अपडेटसह येतो. महत्त्वाचे म्हणजे या फोनमध्ये गॅलेक्सी एस24 सीरीजचे गॅलेक्सी एआय फीचर्स मिळतील.

या फ्लॅगशिप फोनमध्ये 50MP OIS + 12MP + 10MP रिअर आणि 12MP सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 25W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगसह 3,900mAh बॅटरी मिळेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3, NFC आणि चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट देखील मिळेल.

Leave a Comment