Samsung Galaxy S23 5G : काही दिवसांपूर्वी Samsung ने आपला Samsung Galaxy S23 5G हा फोन लाँच केला होता. आता AI फीचर्स असलेल्या सॅमसंगच्या 5G फोनची किंमत वाढली आहे. पण तो तो 25000 रुपयांना स्वस्त उपलब्ध आहे.
Samsung Galaxy S23 5G मध्ये अनेक शानदार फीचर्स दिली आहेत. या फोनमध्ये तुम्हाला Snapdragon प्रोसेसर आणि DSLR लेव्हल कॅमेरा मिळेल. तसेच तुम्ही मोठ्या डिस्काउंटसह हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.
तुम्हाला Samsung च्या या फोनमध्ये Rs 74,999 मध्ये Flipkart वरून 25,000 रुपयांनी स्वस्त खरेदी करता येईल. कंपनीचा हा फोन 74,999 रुपयांना लॉन्च केला आहे. पण हा फोन फ्लिपकार्टवर 49,999 रुपयांना विकला जात असून तुम्ही Samsung Axis Bank कार्डने 10% सूट देऊन फोन खरेदी करू शकता. त्याशिवाय बँक ऑफर्ससह, तुम्हाला फ्लिपकार्टमध्ये एक्सचेंज ऑफर मिळतात. तुमच्याकडे जुना फोन असल्यास तुम्ही 40,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
जाणून घ्या फीचर्स
Samsung च्या या फोनमध्ये वापरकर्त्यांना 6.1 इंचाचा मोठा डिस्प्ले पाहायला मिळेल. तर या फोनमध्ये HDR10+ सह डायनॅमिक AMOLED स्क्रीन आणि 1750 nits ची पीक ब्राइटनेस दिली आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये 120Hz चा रिफ्रेश दर दिला आहे.
Galaxy S23 5G मध्ये ग्राहकांना स्मार्टफोनच्या बॅक पॅनलमध्ये ग्लास पॅनल दिले आहे. हा फोन IP68 रेटिंगसह येतो. Samsung Galaxy S23 मध्ये तुम्हाला Qualcomm चा Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर पाहायला मिळेल. Samsung Galaxy S23 कंपनीने 512GB पर्यंत स्टोरेज आणि 8GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे.
तर फोनमध्ये 50MP मुख्य, 10MP दुय्यम कॅमेरा आणि मागील बाजूस 12-मेगापिक्सेल तिसरा कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy S23 5G ला उर्जा देण्यासाठी, 3900mAh बॅटरी दिली आहे जी 25W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.