Samsung Galaxy M55 : लॉन्चपूर्वीच जाहीर झाली Samsung Galaxy M55 ची किंमत, फीचर्स आणि लुक पाहून पडाल मोहात

Samsung Galaxy M55 : सॅमसंग लवकरच आपला नवीन फोन Samsung Galaxy M55 बाजारात लाँच करणार आहे. कंपनी या फोनमध्ये शानदार फीचर्स उपलब्ध करून देणार आहे. या फोनची किंमत देखील खूप कमी असणार आहे.

Samsung Galaxy M55 ची भारतात किंमत

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करून, टिपस्टरने माहिती दिली आहे की Samsung Galaxy M55 तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे.

– 8GB+128GB: 26,999 रुपये

– 8GB+256GB: २९,९९९ रुपये

– 12GB+256GB: 32,999 रुपये

हे लक्षात घ्या की या किमतींची कंपनीने अद्याप पुष्टी केलेली नाही, त्यामुळे ती अचूक मानता येणार नाही.

Samsung Galaxy M55 ची फीचर्स

हे लक्षात घ्या की Galaxy M55 मध्ये 1,000-निट पीक ब्राइटनेस आणि एम्बेडेड ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सरसह 6.7-इंच FHD+ 120 Hz सुपर AMOLED टचस्क्रीन दिली आहे. कंपनीचा हा शानदार फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 जनरल 1 चिपसेटद्वारे समर्थित असून हा फोन स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटसह येईल.

फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सिस्टम असून ज्यात OIS सह 50MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे, तर सेल्फीसाठी तुम्हाला 50MP स्नॅपर कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी दिली जाणार आहे. जी 45W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन One UI 6 सह Android 14 वर चालेल.

Leave a Comment