Samsung Galaxy M55 : स्मार्टफोनच्या किमती आता खूप वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. पण तुम्ही आता कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. तुम्ही आता 50MP सेल्फी कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसर असणारा फोन कमी किमतीत खरेदी करू शकता.
हे लक्षात घ्या की Samsung Galaxy M55 च्या संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीशी संबंधित माहिती Mspoweruser च्या नवीन रिपोर्टमध्ये समोर आली असून त्यात असे समोर आले आहे की या फोनमध्ये 6.7 इंचाचा सुपर AMOLED + डिस्प्ले दिला जाणार आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000nits च्या पीक ब्राइटनेससह समर्थित असणार आहे. पातळ बेझल्ससह डिस्प्ले शिवाय या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 5000mAh बॅटरी देण्यात येणार आहे.
नवीन सॅमसंग फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह 50MP प्राथमिक लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP सेल्फी कॅमेरा मिळेल. सुमारे 180 ग्रॅम वजनाचा हा फोन Android 14 वर आधारित OneUI वर काम करणार आहे.
विशेष म्हणजे मजबूत कामगिरीसाठी, सॅमसंगचा नवीन फोन इन-हाऊस Exynos 1380 प्रोसेसर किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 प्रोसेसरसह येईल. कंपनी या फोनला पूर्ण 5 वर्षांसाठी अपडेट देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Galaxy M55 ची किंमत (अपेक्षित)
लीक आणि रिपोर्ट्सनुसार, नवीन M-सीरीज फोनची सुरुवातीची किंमत 20,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. हे दोन रंग पर्यायांमध्ये लॉन्च केले जाईल. हलका हिरवा आणि काळा. मात्र, त्याची अधिकृत लॉन्च तारीख अजूनही समोर आली नाही. कंपनीच्या वेबसाइट शिवाय हा फोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध असू शकते.