Samsung Galaxy M35 : सॅमसंग लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन फोन Samsung Galaxy M35 लाँच करणार आहे. यात तुम्हाला 50MP कॅमेरासह 6000mAh बॅटरी मिळेल. जो तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल.
मिळेल 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी
लीक झालेल्या रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या नवीन फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देईल. तर प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये Exynos 1380 चिपसेट पाहता येईल. तर फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.
तसेच बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh बॅटरी मिळेल जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा सॅमसंगचा नवीन फोन Android 14 OS वर काम करेल. कंपनी फोनमध्ये Android 14 वर आधारित OneUI 6.0 किंवा OneUI 6.1 देईल की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
लवकरच लाँच होईल नवीन फोन
हे लक्षात घ्या की Samsung आपला नवीन स्मार्टफोन Galaxy F55 5G 17 मे रोजी भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा शानदार फोन 12 GB रियल आणि 12 GB व्हर्चुअल रॅम सह येईल. इतकेच नाही तर या जबरदस्त फोनची एकूण रॅम 24 जीबी पर्यंत होते.
प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर पाहायला मिळणार असून कंपनी या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देईल. तर त्याच वेळी, त्याचा सेल्फी कॅमेरा देखील 50 मेगापिक्सेल असणार आहे. या फोनमध्ये दिलेली बॅटरी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सॅमसंग या फोनसाठी 5 वर्षांसाठी चार OS अपग्रेड आणि सुरक्षा अपडेट आणणार आहे.