Samsung Galaxy A35 5G : सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन, शानदार लुकसह मिळेल जबरदस्त फीचर्स; पहा किंमत..

Samsung Galaxy A35 5G : Samsung आपला एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हीं उत्तम संधी आहे. कंपनी आपल्या फोनमध्ये 50MP कॅमेरा, शानदार डिस्प्ले आणि प्रोसेसर देत आहे. तुमच्यासाठी हा उत्तम फोन आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या फोनने गीकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 1021 गुण आणि मल्टी-कोअर टेस्टमध्ये 1380 गुण मिळवले आहेत. लिस्टिंगनुसार, कंपनी त्यात एक प्रोसेसर देणार असून तो चार कॉर्टेक्स-ए७८ आणि चार ए५५ कोरसह येईल. तुम्हाला या फोनमध्ये ARM Mali-G68 GPU देखील पाहायला मिळेल.

Galaxy A35 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लीक रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या या फोनमध्ये 1080×2340 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. तसेच कंपनीने या फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन दोन प्रकारांमध्ये येऊ शकतो – 6 GB + 128 GB आणि 8 GB + 256 GB. हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करेल.

इतकेच नाही तर फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले जातील. यात 50-मेगापिक्सेल मुख्य लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 5-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरचा समावेश असून रिपोर्ट्सनुसार, या कॅमेरा सेटअपसह, वापरकर्ते 30 fps वर 4K व्हिडिओ शूट करण्यास सक्षम असणार आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फोनची बॅटरी 5000mAh असेल, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. जोपर्यंत OS चा संबंध आहे, तुम्हाला फोनमध्ये Android 14 वर आधारित OneUI 6.1 पाहायला मिळणार आहे. किमतीचा विचार केला तर युरोपमध्ये या फोनची किंमत 379 युरो (जवळपास 34 हजार रुपये) असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment