Samsung Galaxy A34 : ग्राहकांसाठी गुडन्यूज! आता स्वस्तात घरी न्या Samsung चा ‘हा’ शक्तिशाली फोन

Samsung Galaxy A34 : जर तुम्ही Samsung चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही कंपनीचा Samsung Galaxy A34 हा फोन किमतीपेक्षा आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. यात कंपनीने 48MP कॅमेरा आणि 8GB RAM दिली आहे.

जाणून घ्या Samsung Galaxy A34 ची नवीन किंमत

किमतीचा विचार केला तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये Samsung Galaxy A34 पहिल्यांदा 2,000 रुपयांनी स्वस्त केला होता. पण आता देखील Samsung Galaxy A34 ची किंमत 1,000 रुपयांनी कमी झाली आहे, त्यानंतर Samsung Galaxy A34 ची 27,999 रुपयांना विक्री केली जात आहे. हा स्मार्टफोन काळा, सिल्व्हर, फिकट हिरवा आणि फिकट जांभळा रंग पर्यायांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल.

जाणून घ्या तपशील

कंपनीकडून Samsung Galaxy A34 मध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात येत आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 1080 प्रोसेसरसह येतो आणि 8GB पर्यंत RAM सह जोडला जाऊ शकतो. स्टोरेजचा विचार केला तर या स्मार्टफोनमध्ये 128GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे जे मायक्रोएसडी कार्ड टाकून आणखी वाढवता येते.

Samsung Galaxy A34 मध्ये 5000 mAh बॅटरी असून जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हे IP68 रेटिंगसह येते जे स्मार्टफोनला पाणी आणि धूळपासून संरक्षण करेल. हा फोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टम चालवतो आणि यात ट्रिपल रिअर कॅमेरा मिळत आहे. ज्यामध्ये 48MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स कॅमेरा आणि 5MP मॅक्रो कॅमेरा यांचा समावेश आहे. समोर 13MP सेल्फी कॅमेरा आहे.

Leave a Comment