मुंबई: नागपूर ते शिर्डी अंतर केवळ पाच तासात पार करण्याचे प्रवाशांचे स्वप्न ११ डिसेंबरपासून पूर्ण होणार आहे. मात्र नागपूर ते मुंबई असा थेट आठ तासात प्रवास करण्यासाठी आणखी एक वर्ष म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. समृद्धी महामार्गाचे जसजसे काम पूर्ण होईल तसतसे टप्प्याटप्प्यात सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. त्यानुसार एकूण चार टप्प्यात महामार्ग सुरू करण्यात येणार असून मे मध्ये नागपूर ते इगतपुरी असा ६२३ किमीचा टप्प्या वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. हि माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी लोकसत्ताला दिली आहे.
लोकार्पणाचे चार टप्पे पुढिल प्रमाणे आहेत.
नागपूर ते शिर्डी-५२० किमी-११ डिसेंबर २०२२
नागपूर ते सिन्नर-५६५ किमी-फेब्रुवारी २०२३
नागपूर ते भरवीर जंक्शन-६००किमी-मार्च २०२३
नागपूर ते ठाणे (मुंबई)-७०१ किमी-डिसेंबर २०२३
must read