मुंबई – क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला (Aryan Khan) क्लीन चिट दिल्यानंतर आता या प्रकरणाचे माजी तपास अधिकारी समीन वानखेडे (Sameer Wankhede) चांगलेच चर्चेत आले आहेत. आर्यन खान अमली पदार्थ जप्ती प्रकरणातील माजी एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्या चौकशीबाबत सरकारने सक्षम अधिकाऱ्याला योग्य ती कारवाई करण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सरकारने यापूर्वीच कारवाई केली आहे.

बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सुमारे 6 महिन्यांच्या तपासानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आर्यन खानसह एकूण 6 आरोपींना क्लीन चिट दिली, तर 14 जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत तक्रारी दाखल करण्यासोबतच शुक्रवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी आर्यन खानशिवाय अन्य 19 आरोपींना अटक करण्यात आली होती. दोन वगळता सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तपासात समीर वानखेडे यांच्या टीमने चूक केल्याचे सांगितले. दुसरीकडे, इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, खान यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर वानखेडे प्रश्न टाळताना दिसले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या अहवालात आर्यन खानला क्लीन चिट दिल्यावर समीर वानखेडे म्हणाला, ‘माफ करा, मला काही सांगायचे नाही. मी एनसीबीमध्ये नाही, जा आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोला.

Share.

Leave A Reply

Exit mobile version